नामी खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलेल्या जयपूर पिंक पँथर्स संघाची यंदाच्या हंगामातही फारशी चांगली कामगिरी होताना दिसत नाहीये. नोएडा येथे सुरु असलेल्या सामन्यांमध्ये गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने अष्टपैलू खेळ करत जयपूरवर 36-25 ने मात केली. आतापर्यंत जयपूरच्या संघाने केवळ 1 सामना जिंकलेला आहे.

अवश्य वाचा – ….म्हणून सहाव्या हंगामात प्रो-कबड्डीची प्रेक्षकसंख्या घटली

पहिल्या सत्रात गुजरातने आक्रमक सुरुवात करुन मोठी आघाडी घेतली. मात्र जयपूरच्या बचावपटूंनी सामन्यात आश्वासक पकडी करत बरोबरी साधली. मात्र सुनिल कुमार, सचिन यांनी वेळेतच खेळाची गती वाढवत जयपूरला सामन्यात पुन्हा बॅकफूटला ढकललं. गुजरातचा रोहित गुलियाही आजच्या सामन्यात फॉर्मात आला. या खेळामुळे मध्यांतरापर्यंत गुजरातने आपलं वर्चस्व कायम राखलं.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानात उत्तर प्रदेशची पराभवाने सुरुवात, तामिळ थलायवाज विजयी

जयपूरच्या खेळाडूंना आजच्या सामन्यात सातत्य राखता आलं नाही. सुरुवातीपासून कोणताच खेळाडू लयीत खेळला नाही, ज्याचा फटका त्यांना बसला. बचावफळीत कोरियाच्या याँग चँग को ने 5 गुण कमावले, त्याला मोहित छिल्लरने 4 गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. मात्र जयपूरचे बचावपटू आपला प्रभाव पाडू शकले नाही. अनुप कुमार, दिपक निवास हुडा आणि नितीन रावल हे खेळाडू सामन्यात मिळून फक्त 10 गुण कमावू शकले. दुसऱ्या सत्रात जयपूरकडे सामन्यात बरोबरी साधण्याची संधी होती, मात्र यावेळीही खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. अखेर गुजरातने शेवटपर्यंत सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखत सामन्यात बाजी मारली.

Story img Loader