प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वामध्ये इंटर झोन चॅलेंज स्पर्धेत गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने तामिळ थलायवाजचा धुव्वा उडवला. चढाईपटू व बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर गुजरातने हा सामना ३६-२५ ने जिंकला. गुजरातकडून सचिन तवंरने चढाईत १२ गुणांची कमाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : पाटणा पायरेट्सचा अष्टपैलू खेळ, जयपूर पिंक पँथर्स पराभूत

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी एकमेकांना मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं. गुजरातकडून सचिनने सुरेख खेळ करत काही चांगले गुण कमावले, दुसरीकडून तामिळ थलायवाजच्या अजय ठाकूर आणि सुकेश हेगडेने चांगली टक्कर दिली. मात्र दुसऱ्या सत्रात गुजरातच्या संघाने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवला. तामिळ थलयावच्या बचावफळीला खिंडार पाडत गुजरातच्या चढाईपटूंनी काही सुरेख गूण कमावले. गुजरातच्या बचावफळीत ऋतुराज कोरावी, सुनील कुमार यांनी चांगला खेळ केला. मात्र दुसऱ्या सत्रात तामिळ थलायवाजचे बचावपटू आश्वासक कामगिरी करु शकले नाहीत. याचा फायदा घेत गुजरातने सामन्यात बाजी मारली.