प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात जयपूर पिंक पँथर्स संघाने आपल्या घरच्या मैदानातील सामने जयपूर ऐवजी पंचकुलाला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. सवाई मानसिंह इनडोअर मैदानात सध्या बांधकाम सुरु असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे. १४ ते २० डिसेंबरदरम्यान जयपूर पिंक पँथर्स आपल्या घरच्या मैदानावरचे सामने खेळणार आहे. जयपूरचे संघमालक, स्पर्धेचे आयोजक मार्शल स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्स यांच्या संयुक्त टीमने पंचकुलाच्या जागेची पाहणी केली आहे. यानंतर पंचकुलातल्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. प्रो-कबड्डीच्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये जयपूरच्या संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही, त्यामुळे पंचकुलातलं नवीन मैदान त्यांना लाभदायक ठरतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा