सहाव्या हंगामातील दुसऱ्या इंटरझोन चॅलेंज प्रकारात हरयाणा विरुद्ध तामिळ थलायवाज हा सामना बरोबरीत सुटला आहे. शेवटच्या मिनीटापर्यंत रंगलेल्या सामन्यात दोन्ही संघांना अखेर 32-32 अशा बरोबरीवर समाधान मानावं लागलं. दोन्ही संघांनी सामन्यात अष्टपैलू खेळ केल्याने हा सामना बरोबरीत सुटला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तामिळ थलायवाजकडून सुकेश हेगडे, अजय ठाकूर, जसवीर सिंह यांनी आक्रमक खेळ केला. या त्रिकुटाला बचावफळीनेही उत्तम साथ दिली. पहिल्या 10 मिनीटांमध्ये तामिळ थलायवाजचा संघ सामन्यात आघाडीवर होता, मात्र यानंतर हरयाणाने सामन्याची सुत्र पालटवून मध्यांतरापर्यंत 19-15 अशी आघाडी घेतली.

हरयाणाकडून चढाईमध्ये विकास कंडोलाने पुन्हा एकदा आपलं महत्व अधोरेखित केलं आहे. विकास कंडोलाने चढाईत तब्बल 14 गुणांची कमाई केली. त्याला नवीननेही 5 गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. दुसऱ्या सत्रात तामिळ थलायवाजने सामन्यात पुन्हा आघाडी घेतल्यानंतर विकास कंडोलाने आक्रमक चढाया करत सामन्यात पुनरागमन केलं. अखेरच्या क्षणी तामिळ थलायवाजला सामन्यात विजय मिळवण्याची संधी होती, मात्र जसवीर सिंहने सावध पवित्रा घेत सामन्यात बरोबरी पत्करण पसंत केलं.