प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात पाटणा पायरेट्स संघाचा कर्णधार प्रदीप नरवालने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. सर्वात कमी सामन्यांमध्ये चढाईत 700 गुणांचा टप्पा पार करणारा प्रदीप पहिला खेळाडू ठरला आहे. प्रदीपने हरयाणा स्टिलर्सविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम केला. 71 सामन्यांमध्ये प्रदीपने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. याआधी राहुल चौधरीने 84 सामन्यांमध्ये अशी कामगिरी केली होती.

घरच्या मैदानावर खेळत असताना पाटणा पायरेट्सला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. यू मुम्बाने एका गुणाच्या फरकाने पाटण्याला हरवल्यानंतर हरयाणानेही पाटण्याला पराभवाची चव चाखायला भाग पाडलं. मात्र या सामन्यात प्रदीपने चढाईत आपली छाप पाडली. त्यामुळे या पुढच्या सामन्यांमध्ये गतविजेते पाटणा पायरेट्स कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

प्रो-कबड्डीच्या इतिहासातले चढाईत सर्वाधिक गुण मिळवणारे चढाईपटू -़

1) प्रदीप नरवाल – (पाटणा पायरेट्स) – 71 सामन्यांमध्ये 713 गुण

2) राहुल चौधरी – (तेलगू टायटन्स) – 84 सामन्यांमध्ये 700 गुण

3) अजय ठाकूर – (तामिळ थलायवाज) – 88 सामन्यांमध्ये 616 गुण

4) दिपक निवास हुडा – (जयपूर पिंक पँथर्स) – 86 सामन्यांमध्ये 541 गुण

5) काशिलींग अडके – (बंगळुरु बुल्स) – 76 सामन्यांमध्ये 518 गुण

6) अनुप कुमार – (जयपूर पिंक पँथर्स) – 83 सामन्यांमध्ये 510 गुण

7) रिशांक देवाडीगा – (यूपी योद्धा) – 86 सामन्यांमध्ये 491 गुण

8) रोहित कुमार – (पुणेरी पलटण) – 52 सामन्यांमध्ये 371 गुण

9) नितीन तोमर – (पुणेरी पलटण) – 52 सामन्यांमध्ये 371 गुण

10) मणिंदर सिंह – (बंगाल वॉरियर्स) – 42 सामन्यांमध्ये 369 गुण

Story img Loader