नितीन तोमरने प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात कोट्यवधी रुपयांची बोली लागलेल्या मोजक्या खेळाडूंमध्ये आपलं स्थान राखलं. पुणेरी पलटण संघाने यंदा १ कोटी १५ लाखांची बोली लावत नितीन तोमरला आपल्या संघात कायम राखलं. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये नितीन तोमर पुणेरी पलटण संघाच्या चढाईची सुत्र सांभाळतो आहे. सध्या नितीन तोमर सहाव्या हंगामात चढाईमध्ये सर्वात गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आघाडीवर आहे. नितीनच्या खात्यात सध्या १०० गुण जमा आहेत. मात्र आपल्या या कामगिरीपेक्षा संघाचं यश अधिक महत्वाचं असल्याचं नितीन तोमरने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“वैय्यक्तिक कामगिरीपेक्षा मला संघाचं यश अधिक महत्वाचं आहे. माझ्या संघाचं आव्हान शेवटपर्यंत कायम राखून विजेतेपद मिळवून देणं हे माझं ध्येय आहे. यासाठी मी १०० टक्के प्रयत्न करेन.” Sportskeeda संकेतस्थळाशी बोलत असताना नितीन तोमर बोलत होता. सहाव्या हंगामात पुणेरी पलटणच्या प्रशासनाने अशन कुमार यांच्यावर संघाची जबाबदारी दिलेली आहे. अशन कुमार हे अतिशय मनमिळाऊ प्रशिक्षक असून प्रत्येक खेळाडू मैदानात सर्वोत्तम कामगिरी कशी करेल याकडे त्यांचं लक्ष असतं. याचसोबत गिरीश सारखा तरुण कर्णधार सोबतीला असल्यामुळे यंदा आमच्या संघाच्या आशा वाढल्या आहेत.

अवश्य वाचा – ….म्हणून सहाव्या हंगामात प्रो-कबड्डीची प्रेक्षकसंख्या घटली

पहिल्या १२ पैकी ६ सामने जिंकत पुणेरी पलटण संघाने चांगली कामगिरी केली आहे. सध्या अ गटात पुण्याचा संघ ३७ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. आजपासून प्रो-कबड्डीचे सामने उत्तर प्रदेशमध्ये सुरु होणार आहेत, त्यामुळे या फेरीत पुण्याच्या संघाची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : पुणेरी पलटणचा कर्णधार गिरीश एर्नाकला दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान