प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात तेलगू टायटन्स संघाचा महत्वाचा खेळाडू राहुल चौधरीने विक्रमी कामगिरी करण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात तेलगू टायटन्सला यू मुम्बाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला, मात्र या सामन्यात राहुलने प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाईमध्ये ७०० गुणांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा राहुल पहिलाच खेळाडू ठरला आहे. आपल्या ८४ व्या सामन्यात राहुलने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाच्या विजयात मराठमोळा सिद्धार्थ देसाई चमकला

प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाईमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे खेळाडू –

राहुल चौधरी – ७०० गुण*
(यू मुम्बाविरुद्ध सामन्यापर्यंत)

प्रदीप नरवाल – ६७१ गुण

अजय ठाकूर – ६०९ गुण

दिपक निवास हुडा – ५२५ गुण

काशिलींग अडके – ५१७ गुण

Story img Loader