बंगळुरु बुल्सविरुद्ध सामन्यात तेलगू टायटन्सला अटीतटीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र संघाचा महत्वाचा खेळाडू राहुल चौधरीने धडाकेबाज कामगिरी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. प्रो-कबड्डीच्या इतिहासात 800 गुणांची कमाई करणारा राहुल चौधरी पहिला खेळाडू ठरला आहे.
बंगळुरुविरुद्ध सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी राहुलला अवघ्या 3 गुणांची गरज होती. आतापर्यंत प्रो-कबड्डीच्या इतिहासात 90 सामन्यांमध्ये राहुल चौधरीच्या नावावर 797 गुण जमा होते. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात आठव्या मिनीटालाच राहुलने ही कामगिरी करुन दाखवली.
प्रो-कबड्डीत सर्वाधीक गुण मिळवणारे कबड्डीपटू –
राहुल चौधरी – तेलगू टायटन्स – 803 गुण
प्रदीप नरवाल – पाटणा पायरेट्स – 778 गुण
अजय ठाकूर – तामिळ थलायवाज – 688 गुण
दिपक निवास हुडा – जयपूर पिंक पँथर्स – 680 गुण
काशिलींग अडके – बंगळुरु बुल्स – 602 गुण
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : तेलगू टायटन्सची झुंज मोडून काढत बंगळुरु बुल्सची बाजी