प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वातील इंटर झोन चॅलेंज स्पर्धेत पुणेरी पलटणला आपल्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. तामिळ थलायवाजने पुणेरी पलटणची झुंज 36-31 ने मोडून काढत सामन्यात बाजी मारली. पुण्याच्या बचावपटूंची खराब कामगिरी हे त्यांच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाच्या विजयात मराठमोळा सिद्धार्थ देसाई चमकला

गेल्या काही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या तामिळ थलायवाजने आजच्या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. सुरुवातीपासून पुण्याच्या कमकुवत बचावफळीचा तामिळ थलायवाजने फायदा घेतला. कर्णधार अजय ठाकूर, जसवीर सिंह, सुकेश हेडगे या त्रिकुटाने पुण्याच्या बचावफळीला खिंडार पाडलं. पहिल्या सत्रात पुण्याकडून नितीन तोमरने चढाईत काही गुण मिळवत तामिळ थलायवाजला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला फारसं यश मिळालं नाही.

दुसऱ्या सत्रात पुण्याने आपला बदली खेळाडू गुरुनाथ मोरेला चढाईची जबाबदारी सोपवली. गुरुनाथनेही काही सुरेख गुणांची कमाई करत तामिळल थलायवाजला चांगला धक्का दिला. मात्र दुसऱ्या बाजूने पुण्याचे बचावपटू गुरुनाथची साथ देऊ शकले नाहीत. कर्णधार गिरीश एर्नाकही आजच्या सामन्यात पुरता निष्रभ ठरला. ज्याचा फायदा घेत तामिळ थलायवाजने 36-31 च्या फरकाने सामन्यात बाजी मारली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : पुणेरी पलटणचा कर्णधार गिरीश एर्नाकला दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान