क्रिकेटवेड्या भारताला प्रो-कबड्डीने एक पर्याय दिला. गेल्या ५ हंगामांमध्ये क्रीडा प्रेमींनी कबड्डीच्या सामन्यांना भरघोस प्रतिसाद दिला, मात्र सहाव्या हंगामात सुरुवातीचे काही आठवडे प्रो-कबड्डीच्या आयोजकांसाठी जरा कठीण जात आहेत. पहिल्या २४ सामन्यांनंतर प्रो-कबड्डीची प्रेक्षकसंख्या घटल्याची माहिती BARC (Broadcast Audience Research Council) च्या सर्वेक्षणामध्ये समोर आली. पाचव्या हंगामाच्या तुलनेत सहाव्या हंगामात पहिल्या १२ सामन्यांनतर प्रेक्षकसंख्येत ३१ टक्क्यांची घट झाली. शहरी भागात ही घट २५ टक्के तर ग्रामीण भागात ही घट ३३ टक्क्यांवर गेलेली आहे. तब्बल 12 संघाचा सहभाग असलेली ही स्पर्धा तब्बल ९ वाहिन्यांवरुन प्रसारित केली जाते. देशभरात अंदाजे २३ कोटी ७ लाख लोकांनी सहाव्या हंगामातले पहिले २४ सामने पाहिले. पाचव्या हंगामात पहिले २४ सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ही अंदाजे ३४ कोटीच्या घरात होती. याचसोबत सामने प्रसारित करणाऱ्या ९ वाहिन्यांपैकी एकाच वाहिनीला जास्त टीआरपी मिळालेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा