इंटर झोन चॅलेंज प्रकारात ब गटातील अव्वल संघ असलेल्या बंगळुरु बुल्सविरोधात खेळताना यू मुम्बाने आपली धडाकेबाज कामगिरी सुरु ठेवली आहे. अटीतटीच्या लढतीत यू मुम्बाने बंगळुरु बुल्सची झुंज 32-29 ने मोडून काढली. पहिल्या सत्रापासून सामन्यावर पकड ठेवत खेळणाऱ्या यू मुम्बाला बंगळुरुने दुसऱ्या सत्रात चांगली टक्कर दिली, मात्र आपल्याजवळील आघाडी कायम राखत यू मुम्बाने सामन्यात बाजी मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : हरयाणा विरुद्ध तामिळ थलायवाज सामना बरोबरीत

सिद्धार्थ देसाई, अभिषेक सिंह या चढाईपटूंच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या यू मुम्बाने बंगळुरु बुल्सच्या बचावाला खिंडार पाडलं. अबुफजल मग्शदुलू आणि दर्श कादीयानने झटपट गुणांची वसुली करत पहिल्या 10 मिनीटांमध्येच मोठी आघाडी घेतली. काही कालावधीनंतर बंगळुरुचा कर्णधार रोहित कुमारने काही गुणांची कमाई करत आपल्या संघाचं खातं उघडलं. मात्र मध्यांतरापर्यंत यू मुम्बाने सामन्यात 17-6 अशी मोठी आघाडी कायम ठेवली होती.

अवश्य वाचा – मैदानात उतरलो की फक्त खेळाकडे लक्ष देतो – सिद्धार्थ देसाई

दुसऱ्या सत्रामध्ये बंगळुरुने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्याचं चित्र काही प्रमाणात पालटवलं. पहिल्या सत्राप्रमाणे दुसऱ्या सत्रातही बंगळुरुचे बचावपटू फारशी चमक दाखवू शकले नाहीत. मात्र पवन शेरावत, रोहित कुमार, काशिलींग अडके यांनी चढाईत काही गुणांची कमाई करत सामन्यात रंगत आणली. मात्र दुसऱ्या बाजूने यू मुम्बाच्या सुरेंदर सिंहने आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत अखेरच्या मिनीटांमध्ये बंगळुरु सामन्यात बाजी मारणार नाही याची काळजी घेतली. सुरेंदरने यू मुम्बाकडून चढाईत 5 गुण मिळवले, त्याला कर्णधार फजल आणि उजवा कोपरारक्षक धर्मराज चेरलाथनने चांगली साथ दिली. या जोरावर यू मुम्बाने आपल्या घरच्या मैदानावर 3 गुणांच्या फरकाने सामन्यात बाजी मारली.