प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात यू मुम्बाने आपला धडाकेबाज कायम राखला आहे. विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात यू मुम्बाने दबंग दिल्लीचा ४४-१९ ने धुव्वा उडवला. या स्पर्धेतला यू मुम्बाचा दबंग दिल्लीवरचा हा तिसरा विजय ठरला आहे. यू मुम्बाच्या अष्टपैलू खेळापुढे दबंग दिल्लीचा संघ तग धरु शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यू मुम्बाकडून चढाईमध्ये सिद्धार्थ देसाई, रोहित बालियान आणि नवोदीत अर्जुन देशवालने चांगली चमक दाखवली. सिद्धार्थने १२ गुण कमावले. यू मुम्बाच्या या त्रिकुटावर अंकुश ठेवण्याचं काम करण्यात दबंग दिल्लीचा संघ अपयशी ठरला. त्यात अनुभवी बचावपटूंची आजच्या सामन्यातली अनुपस्थिती दबंग दिल्लीला चांगलीच भोवली. याचा पुरेपूर फायदा यू मुम्बाने घेतला. यू मुम्बाच्या बचावफळीनेही आज आपल्या खेळाडूंना तोलामोलाची साथ दिली.

दुसरीकडे दबंग दिल्लीच्या चढाईपटूंनी सामन्यात आश्वासक खेळ केला. शब्बीर बापू आणि चंद्रन रणजीत यांनी चढाईत प्रत्येकी ५-५ गुणांची कमाई करत यू मुम्बाला चांगली झुंज दिली. मात्र बचावफळीत सतपालचा अपवाद वगळता एकही बचावपटू आपली चमक दाखवू शकला नाही. या पराभवानंतरही दबंग दिल्लीचा संघ अ गटात तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीच्या संघाला आगामी सामन्यांमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे.