प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात यू मुम्बाचा आणि मूळचा कोल्हापूरचा असलेल्या सिद्धार्थ देसाईने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केलेली आहे. जयपूर पिंक पँथर्सविरुद्ध सामना खेळत असताना सिद्धार्थने प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाईमध्ये सर्वाधिक २०० गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम करत असताना सिद्धार्थने राहुल चौधरी आणि अनुप कुमाप या दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं. सिद्धार्थने १९ सामन्यांमध्ये हा कारनामा केला आहे. राहुल चौधरी आणि अनुप कुमार यांनी ही कामगिरी करण्यासाठी २० पेक्षा जास्त सामने घेतले होते.

Story img Loader