प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात सध्या इंटर झोनल चॅलेंज स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये दिग्गज खेळाडूंऐवजी तरुण खेळाडूंना सोबत घेऊन खेळणाऱ्या संघाची कामगिरी निश्चितच वाखणण्याजोगी आहे. यंदाच्या हंगामात युवा चढाईपटूंनी आपल्या खेळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आतापर्यंतच्या सामन्यांत सर्वाधिक वेळा 10 गुण मिळवणाऱ्यांच्या यादीत यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईने बाजी मारली आहे.

एखाद्या चढाईपटूने एका सामन्यात चढाईमध्ये 10 पेक्षा जास्त गुण मिळवले तर त्याला सुपर 10 असं म्हटलं जातं. यू मुम्बाच्या मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने आतापर्यंत 5 पैकी 4 सामन्यांमध्ये Super 10 ची कमाई केली आहे. पुण्याचा अनुभवी खेळाडू नितीन तोमरनेही 4 वेळा Super 10 ची कमाई केली आहे, मात्र यासाठी त्याला 8 सामने लागले. सिद्धार्थने 5 सामन्यांमध्येच ही कामगिरी केली आहे.

सर्वाधिक वेळा Super 10 मिळवणारे खेळाडू –

1) सिद्धार्थ देसाई – यू मुम्बा (5 सामन्यात 4 Super 10)

2) नितीन तोमर – पुणेरी पलटण (8 सामन्यात 4 Super 10)

या दोन खेळाडूंव्यतिरीक्त अजय ठाकूर, प्रदीप नरवाल, काशिलींग अडके या अनुभवी व तरुण खेळाडूंनाही संघात जागा मिळाली आहे. उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळणाऱ्या श्रीकांत जाधवनेही 5 सामन्यात दोन वेळा Super 10 मिळवत या यादीमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. त्यामुळे आगामी स्पर्धेत हे खेळाडू कशी कामगिरी करतायत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम

Story img Loader