घरच्या मैदानावर खेळत असलेल्या यूपी योद्धा संघाने अखेर आपली पराभवाची मालिका काहीकाळासाठी खंडीत केली आहे. बंगाल वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशने 30-30 अशी बरोबरी साधली. अखेरच्या क्षणापर्यंत हा सामना चांगलाच रंगतदार झाला होता, मात्र दोन्ही संघांनी सामना बरोबरीत सोडवण्यात समाधान मानलं.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीची झुंज अपयशी, गुजरात फॉर्च्युनजाएंट विजयी

पहिल्या सत्रापासून दोन्ही संघ हे एकमेकांना मोठी आघाडी घेऊ देत नव्हते. बंगालकडून मणिंदर सिंहने चढाईत सर्वाधीक गुणांची कमाई केली. त्याला अन्य खेळाडूंनीही चांगली साथ दिली. उत्तर प्रदेशच्या कमकुवत बचावफळीचा फायदा मणिंदरने चांगल्या पद्धतीने घेतला. मात्र दुसऱ्या बाजूने उत्तर प्रदेशच्या रिशांक देवाडीगा-श्रीकांत जाधव जोडीने चांगली झुंज देत पुनरागमन केलं. मध्यांतराला बंगालचा संघ सामन्यात 12-11 अशी एका गुणाची आघाडी घेऊ शकला. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघातील चढाईपटूंनी आक्रमक खेळ करत चांगली टक्कर दिली. मात्र अखेर हा सामना बरोबरीतच सुटला.

Story img Loader