प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात अनेक तरुण चढाईपटूंनी आपली दखल सर्वांना घ्यायला भाग पाडलं आहे. मात्र बचावपटूंच्या यादीत अजुनही अनुभवी खेळाडूच आपलं वर्चस्व राखून आहेत. आतापर्यंत High 5 कमावणाऱ्या बचावपटूंमध्ये अनुभवी खेळाडूंनीच बाजी मारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या यादीत महाराष्ट्राच्या 3 बचावपटूंना सर्वोत्तम 10 जणांच्या यादीत स्थान मिळालं आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : जाणून घ्या आतापर्यंतचे सर्वोत्तम 5 चढाईपटू

प्रो-कबड्डीत एखाद्या बचावपटूने, 5 किंवा त्यापेक्षा जास्त गुणांची कमाई केली तर ते गुण High 5 म्हणून पकडले जातात. यंदाच्या हंगामात दबंग दिल्ली संघाकडून खेळणारा विशाल माने या यादीमध्ये आघाडीवर आहे. तर पुणेरी पलटण संघाचा कर्णधार डावा कोपरारक्षक गिरीश एर्नाकने या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. याचसोबत पुणेरी पलटणच्या अक्षय जाधवने सर्वोत्तम 10 जणांच्या यादीत सातवं स्थान पटकावलं आहे.

High 5 मिळवणाऱ्या सर्वोत्तम 10 चढाईपटूंची नावं पुढीलप्रमाणे –

1) विशाल माने – दबंग दिल्ली – 2 सामन्यात 1 High 5

2) गिरीश एर्नाक – पुणेरी पलटण – 4 सामन्यात 1 High 5

3) आशिष कुमार – बंगळुरु बुल्स – 1 सामन्यात 1 High 5

4) अमित हुडा – तामिळ थलयावजा – 5 सामन्यात 1 High 5

5) फजल अत्राचली – यू मुम्बा – 3 सामन्यात 1 High 5

6) सागर कृष्णा – यूपी योद्धाज – 4 सामन्यात 1 High 5

7) अक्षय जाधव – पुणेरी पलटण – 3 सामन्यात 1 High 5

8) अबुझार मोहजरमिघानी – तेलगू टायटन्स – 2 सामन्यात 1 High 5

9) कुलदीप सिंह – हरयाणा स्टिलर्स – 4 सामन्यात 1 High 5

10) नरेंदर – यूपी योद्धाज – 4 सामन्यात 1 High 5

Story img Loader