Vivo Pro Kabaddi League : वीवो प्रो कबड्डी सीझन ८ मध्ये (PKL Season 8) बेंगलुरू बुल्सने (Bengaluru Bulls) तमिळ थलायवाजचा (Tamil Thalaivas) पराभव करत विजय मिळवला तर, गुजरातला आपल्या खराब कामगिरीचा थेट फटका बसत पराभव पत्करावा लागला. या सामन्यात बंगाल वॉरियर्सने बाजी मारली. सीझन ८ च्या आठव्या सामन्यात बेंगलुरू बुल्सने थलायवाजचा ३८-३० असा पराभव केला. बेंगलुरूचा हा या सीझनमधील पहिला विजय आहे. दुसरीकडे थलायवाजने २ विजय मिळवल्यानंतर हा त्यांचा पहिला पराभव आहे. बंगलुरू या विजयासह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आलीय.

दुसरीकडे प्रो कबड्डी लीगच्या ८ व्या सीझनमधील (Pro Kabaddi League, PKL) ९ व्या सामन्यात गत विजेत्या बंगाल वॉरियर्सने (Bengal Warriors) गुजरात जायंट्सचा (Gujarat Giants) ३१-२८ असा पराभव केला. हा बंगालचा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह बंगाल वॉरियर्सचा संघ आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. गुजरातच्या संघाला मात्र दोन विजयांनंतर पहिला पराभव स्विकारावा लागला.

पहिल्या हाफनंतर बेंगलुरु बुल्सने १९-१३ अशी आघाडी घेतली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच तमिळ थलायवाज आणि बेंगलुरु बुल्सच्या डिफेंडर्सने जबरदस्त खेळ दाखवला. दोन्हीही संघांनी आपल्या विरोधी संघाला पुढे जाऊ दिलं नाही. त्यामुळेच पहिल्या हाफमध्ये स्कोअरचा वेग फारच कमी राहिला. बेंगलुरूच्या पवन सेहरावतने तमिळला ऑलआउटच्या जवळ आणून ठेवलं. यानंतर बुल्सने 18 व्या मिनिटाला तमिळ थलायवाजला ऑलआउट करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

बंगाल वॉरियर्ससाठी या सामन्यात बंगालचा कर्णधार मनिंदर सिंहने सर्वाधिक ८ पॉईंट मिळवले. रिंकू नरवालने डिफेंसमध्ये सर्वाधिक ३ पॉईंट्स मिळवले. दुसरीकडे गुजरात जायंट्सच्या राकेश नरवालने सर्वाधिक १२ पॉईंट्स प्राप्त केले.

प्रो कबड्डीचे पुढील सामने कोणते?

२५ डिसेंबर २०२१ : पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता), पुणेरी पलटण विरुद्ध तेलुगू टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (रात्री ९:३० वाजता).

२६ डिसेंबर २०२१ : गुजरात जायंट्स विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि बंगळुरू बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

२७ डिसेंबर २०२१ : तमिळ थलायवाज विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यूपी योद्धा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

२८ डिसेंबर २०२१ : पुणेरी पलटण विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

२९ डिसेंबर २०२१ : दबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यूपी योद्धा विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

३० डिसेंबर २०२१ : जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि हरियाणा स्टीलर्स विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

३१ डिसेंबर २०२१ : तेलुगू टायटन्स विरुद्ध पुणेरी पलटण (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि पाटणा पायरेट्स वि. बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

हेही वाचा – प्रो-कबड्डी लीग : कधी, कुठे आणि कसे पाहता येणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर!

१ जानेवारी २०२२ : यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता), बंगळुरू बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि दबंग दिल्ली विरुद्ध तमिळ थलवायज (रात्री ९:३० वाजता)

२ जानेवारी २०२२ : गुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि पुणेरी पलटण विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

३ जानेवारी २०२२ : बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

४ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यूपी योद्धा विरुद्ध तमिळ थलयवाज (संध्याकाळी ८:३० वाजता).

५ जानेवारी २०२२ : पुणेरी पलटण विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि दबंग दिल्ली विरुद्ध तेलुगु टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

६ जानेवारी २०२२ : पाटणा पायरेट्स विरुद्ध तामिळ थलायवास (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि बंगळुरू बुल्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

७ जानेवारी २०२२ : बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

८ जानेवारी २०२२ : यूपी योद्धा विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ७:३० वाजता), यू मुंबा विरुद्ध तेलुगु टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि गुजरात जायंट्स विरुद्ध पाटणा पायरेट्स (रात्री ९:३० वाजता).

९ जानेवारी २०२२ : पुणेरी पलटण विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) विरुद्ध बंगळुरू बुल्स विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ८:३० वाजता).

१० जानेवारी २०२२ : तमिळ थलयवाज विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ८:३० वाजता).

११ जानेवारी २०२२ : पाटणा पायरेट्स वि यू मुंबा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१२ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि दबंग दिल्ली विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१३ जानेवारी २०२२ : बंगाल वॉरियर्स विरुद्ध तामिळ थलायवाज (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण (संध्याकाळी ८:३० वाजता).

१४ जानेवारी २०२२ : जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि गुजरात जायंट्स विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१५ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध दबंग दिल्ली (संध्याकाळी ७:३० वाजता), यूपी योद्धा विरुद्ध तेलुगू टायटन्स (संध्याकाळी ८:३० वाजता) आणि यू मुंबा विरुद्ध बंगाल वॉरियर्स (रात्री ९:३० वाजता).

१६ जानेवारी २०२२ : तमिळ थलायवाज विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि पाटणा विरुद्ध बंगळुरू बुल्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१७ जानेवारी २०२२ : पुणेरी पलटण विरुद्ध यूपी योद्धा (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि तेलुगु टायटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स (संध्याकाळी ८:३० वाजता).

१८ जानेवारी २०२२ : दबंग दिल्ली विरुद्ध पाटणा पायरेट्स (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि गुजरात जायंट्स विरुद्ध यू मुंबा (संध्याकाळी ८:३० वाजता).

१९ जानेवारी २०२२ : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पुणेरी पलटण (संध्याकाळी ७:३० वाजता) आणि जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तेलुगू टायटन्स (रात्री ९:३० वाजता).

२० जानेवारी २०२२ : तमिळ थलयवाज विरुद्ध गुजरात जायंट्स (संध्याकाळी ७:३० वाजता).

(टीप: आतापर्यंत फक्त २२ डिसेंबर २०२१ ते २० जानेवारी २०२२ पर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.)

Story img Loader