प्रो-कबड्डीमुळे देशासह परदेशात कबड्डीला एक नवीन ओळख निर्माण करुन दिली. प्रो-कबड्डीचा पाचवा हंगाम २०१७ साली नुकताच पार पडला, यामध्ये पाटणा पायरेट्सने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून आपला दबदबा कायम राखला. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने बलाढ्य सेनादलाचा पराभव करत तब्बल ११ वर्षांनी विजेतेपद पटकावलं. त्यामुळे कबड्डीप्रेमींना प्रो-कबड्डीचा पुढचा हंगाम नेमका कधी येणार याची उत्सुकता लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – वैभव टिकवायचे, तर आत्मपरीक्षण हवे!

Sportskeeda या वेबसाईटने दिलेल्या माहितीनूसार आगामी आशियाई खेळांच्याआधी प्रो-कबड्डीचा सहावा हंगाम खेळवला जाऊ शकतो. प्रो-कबड्डीतल्या सामन्यांचे Technical Director ई. प्रसाद राव यांनी दिलेल्या माहितीनूसार १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या आशियाई खेळांआधी प्रो-कबड्डीचा नवीन हंगाम क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येऊ शकतो. २०१८ सालात कबड्डीचा विश्वचषक खेळवला जाईल का असं विचारलं असता प्रसाद राव यांनी नकारार्थी उत्तर दिलं. “सध्या सर्व संघ हे आशियाई खेळांसाठी आपली तयारी करत असतील त्यामुळे कबड्डी विश्वचषक खेळवणं शक्य होणार नाही.” मात्र प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाबद्दलचा निर्णय हा लवकरच घेतला जाण्याची शक्यता असल्याचं राव यांनी स्पष्ट केलं.

२०१८ साली होणारे आशियाई खेळ हे १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान इंडोनेशियातील जकार्ता येथे खेळवले जाणार आहेत. याआधी झालेल्या आशियाई खेळांमध्ये कबड्डीत भारत हा विजेता ठरला होता. त्यामुळे यंदांच्या खेळात आपलं विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान भारतासमोर आहे. प्रो-कबड्डीचा पाचवा हंगाम आणि त्यामागोमाग झालेल्या कबड्डी राष्ट्रीय स्पर्धेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आगामी सहाव्या हंगामाला प्रेक्षक तितकाच चांगला प्रतिसाद देतील याबद्दल शंका काहीच शंका नाही.

अवश्य वाचा – ११ वर्षांनी महाराष्ट्र राष्ट्रीय कबड्डीचा विजेता, अंतिम फेरीत बलाढ्य सेनादलावर मात

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi next season may be start before upcoming asian games says technical director