प्रो-कबड्डी लीगमध्ये पिंक पँथर्स संघाने तेलुगू टायटन्सवर विजय मिळवत विजयाची बोहनी केली तर बंगाल टायगर्सने दबंग दिल्लीवर ४२-४० अशी मात केली. जसवीर सिंग आणि राजेश नरवाल यांनी चढाईत प्रत्येकी ९ गुण कमावत जयपूरच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. जसवीर सवरेत्कृष्ट चढाईपटू तर प्रशांत चव्हाण सवरेत्कृष्ट बचावपटू ठरला. या सामन्यात पाकिस्तानच्या वाजिद अलीने तेलुगू टायटन्सचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत खेळणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला. संघर्षपूर्ण लढतीत पिंक पँथर्सनी तेलुगू टायटन्सवर ४६-३२ असा विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत नितीन मदनेने १० तर जंग कु लीने ८ गुणांची कमाई करत बंगालला विजय मिळवून दिला.
पिंक पँथर्स, बंगाल टायगर्स विजयी
प्रो-कबड्डी लीगमध्ये पिंक पँथर्स संघाने तेलुगू टायटन्सवर विजय मिळवत विजयाची बोहनी केली तर बंगाल टायगर्सने दबंग दिल्लीवर ४२-४० अशी मात केली.
First published on: 01-08-2014 at 04:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi pink panther vs bengal tigers