प्रो-कबड्डी लीगमध्ये पिंक पँथर्स संघाने तेलुगू टायटन्सवर विजय मिळवत विजयाची बोहनी केली तर बंगाल टायगर्सने दबंग दिल्लीवर ४२-४० अशी मात केली. जसवीर सिंग आणि राजेश नरवाल यांनी चढाईत प्रत्येकी ९ गुण कमावत जयपूरच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. जसवीर सवरेत्कृष्ट चढाईपटू तर प्रशांत चव्हाण सवरेत्कृष्ट बचावपटू ठरला. या सामन्यात पाकिस्तानच्या वाजिद अलीने तेलुगू टायटन्सचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत खेळणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला. संघर्षपूर्ण लढतीत पिंक पँथर्सनी तेलुगू टायटन्सवर ४६-३२ असा विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत नितीन मदनेने १० तर जंग कु लीने ८ गुणांची कमाई करत बंगालला विजय मिळवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा