प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाच्या नागपूर येथे खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात पुणेरी पलटणला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणवर ३०-२८ अशी मात केली. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये पुणेरी पलटणकडे आघाडी असूनही ढिसाळ बचावामुळे पुण्याला सामना गमवावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मात्र अखेरच्या सत्रात पुण्याने जोरदार प्रतिकार करत आपल्या पराभवाचं अंतर हे अवघ्या २ गुणांवर आणून ठेवलं. त्यामुळे या पराभवातूनही पुणेरी पलटणच्या संघाला १ गुण मिळणार आहे.

पुण्याचे चढाईपटू पुन्हा एकदा फॉर्मात –

पुणेरी पलटणच्या चढाईपटूंनी या सामन्यातही आपला दमखम दाखवत, जयपूर पिंक पँथर्सच्या संघाला खिंडार पाडलं होतं. सामन्याच्या पहिल्या सत्रात पुणेरी पलटणचा कर्णधार दिपक हुडाने आक्रमक खेळ करत आपल्या चढाईत काही सुरेख पॉईंट मिळवले. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार मनजीत छिल्लरला बाद करण्यात पुण्याच्या चढाईपटूंना यश आलं. दीपक हुडाने आजच्या सामन्यात चढाईत ३ पॉईंट मिळवले, त्याला रोहीत कुमार चौधरी आणि राजेश मोंडलने अनुक्रमे ४ आणि १ पॉईंट मिळवत चांगली साथ दिली.

दुसऱ्या सत्रात पिछाडीवर पडलेल्या पुणेरी पलटणला संदीप नरवालने आपल्या हरहुन्नरी खेळाने सामन्यात परत आणलं. अखेरच्या सत्रात ‘सुपर रेड’ करत संदीपने पुणेरी पलटणच्या आशा जागवल्या. संपूर्ण सामन्यात संदीप नरवालने ९ गुणांची कमाई केली. त्याला दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून आलेल्या गुरुनाथ मोरेनेही ३ पॉईंट मिळवत चांगली साथ दिली.

पुण्याच्या बचावपटूंची घाई जयपूरच्या पथ्थ्यावर –

या सामन्यात पुणेरी पलटणच्या बचावपटूंना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. गिरीश एर्नेक, रवी कुमार यांनी सामन्यात काही चांगले टॅकल केले. मात्र त्यांच्या खेळात सातत्याचा अभाव होता. महत्वाची गोष्ट म्हणजे गिरीश एर्नेक आणि इतर बचावपटूंना धर्मराज चेरलाथनची साथ मिळाली नाही.

जयपूरच्या जसवीर सिंहने आपल्या आक्रमक खेळाने पुण्याच्या बचावफळीत खिंडार पाडलं. काही वेळा पुण्याच्या बचावपटूंनी वॉकलाईनवर जयपूरच्या चढाईपटूंना टॅकल करण्याची चूक केली, ज्याचा फायदा जयपूरच्या चढाईपटूंनी घेतला.

अवश्य वाचा – प्रो-कबड्डीचा दबदबा कायम, पहिल्या आठवड्यात १३ कोटी लोकांच्या घरात प्रवेश

मनजीत छिल्लरचा अष्टपैलू खेळ –

गेली दोन पर्व पुणेरी पलटणकडून खेळणाऱ्या मनजीत छिल्लरने आजच्या सामन्यात आपल्या माजी संघाविरुद्ध अष्टपैलू खेळ केला. चढाईत आणि बचावात मिळून मनजीतने ९ गुणांची कमाई केली. त्याला महाराष्ट्राच्या तुषार पाटीलने ४ गुण मिळवत चांगली साथ दिली. पुणेरी पलटणचे महत्वाचे चढाईपटू मनजीत छिल्लरच्या जाळ्यात अलगद अडकले.

सामन्यात जरी पराभवाचा सामना करावा लागला तरीही अखेरच्या सत्रात पुणेरी पलटणने केलेला प्रतिकार हा कौतुकास्पद होता. त्यामुळे आगामीच्या सामन्यांमध्ये पुणेरी पलटणचा संघ स्पर्धेत कसं पुनरागमन करतोय हे पहावं लागणार आहे.