आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या हरियाणा स्टिलर्सला पहिल्याच सामन्यात बरोबरीवर समाधान मानावं लागलं. गतविजेत्या पाटणा पायरेट्सने जवळपास १५ गुणांची पिछाडी भरुन काढत सामन्यात ४१-४१ अशी बरोबरी साधली. प्रदीप नरवाल आणि मोनू गोयतने अखेरच्या मिनीटांमध्ये केलेला खेळ आणि हरियाणाच्या बचावफळीने केलेल्या चुकांच्या जोरावर पाटणाने या सामन्यात बरोबरी साधली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सामन्याच्या पहिल्या सत्रात हरियाणा स्टिलर्सने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. चढाईपटू वझीर सिंह आणि सुरजीत सिंह यांनी आक्रमक चढाई करत पाटणाची बचावफळी खिळखिळी करुन टाकली. त्याला प्रशांत कुमार रायने चांगली साथ दिली. पाटण्याच्या उजव्या कोपऱ्यातील कमकुवत बचावाचा फायदा घेत वझीर आणि सुरजीतच्या जोडीने चांगल्या गुणांची कमाई केली. त्यामुळे पहिल्या सत्रात गतविजेच्या पाटणा संघावर ऑलआऊट होण्याची वेळ आली. मात्र पहिल्या सत्रातील अखेरच्या काही मिनीटांमध्ये मोनू गोयत आणि कर्णधार प्रदीप नरवालने सामन्याचं चित्रच पालटलं.

मोनू गोयतने एकाच चढाईत ३ गुणांची कमाई करत पाटण्याला संघाला पुनरागमन करण्याची संधी दिली. यानंतर कर्णधार प्रदीप नरवालनेही आक्रमक खेळ करत आपली पिछाडी कमी केली. त्याला बदली खेळाडू विजयनेही चांगली साथ दिली. प्रदीपने सामन्यात १३ तर मोनू गोयतने ११ गुणांची कमाई केली. विशाल माने, सचिन शिंगाडे आणि जयदीप या बचावफळीने पाटण्यासाठी ७ गुणांची कमाई केली.

पाटण्याच्या या आक्रमक खेळापुढे हरियाणाचा संघ पुरता भांबावून गेला. त्यात अखेरच्या सत्रात हरियाणाच्या बचावफळीने काही क्षुल्लक चुका करत पाटण्याला काही गुण बहाल केले. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाटणा पायरेट्सने अखेर हरियाणा संघाला बरोबरीत रोखून गुणतालिकेत आपलं दुसरं स्थान कायम राखलंय.