प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वातील इंटर झोन चँलेज स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातच पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सवर १७-३४ अशी मात केली. प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात संघांची दोन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. आपल्या गटातील संघाव्यतिरीक्त प्रत्येक संघ हा आपल्या विरुद्ध गटातील संघाशी एक सामना खेळणार आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात बंगाल वॉरियर्सवर मात करत पुणेरी पलटणने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुण्याच्या संदीप नरवालने चढाई आणि बचावात केलेला अष्टपैलू खेळ, त्याला गुरुनाथ मोरेने दिलेली साथ यामुळे पुण्याच्या संघाने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. संदीप नरवालने केलेल्या आक्रमक खेळाचं उत्तर आज बंगालच्या एकाही खेळाडूकडे नव्हतं. बंगालच्या मणिंदर सिंहला बचावात ‘डबल थायहोल्ड’ करत त्याला संघाबाहेर बसवलं. बंगालच्या मुख्य चढाईपटूंवर संदीप नरवाल आणि पुण्याच्या बचावपटूंनी असेल हल्ले केले. गिरीश एर्नेकनेही आजच्या सामन्यात बचावात ४ पॉईंटची कमाई केली.

पुण्याकडून कर्णधार दिपक हुडाला आजच्या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही. मात्र गुरुनाथ मोरेने ६ गुणांची कमाई करत संघाच्या विजयात आपला मोलाचा हातभार लावला.

अवश्य वाचा – आम्हाला गुजरातने नाही, पंचांनी हरवलं ! जयपूरचे प्रशिक्षक पंचांवर नाराज

मात्र बंगालच्या संघात आज एकाही खेळाडूला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. मणिंदर सिंहचा अपवाद वगळता एकही चढाईपटू सामन्यात पॉईंट मिळवू शकला नाही. कोरियन खेळाडू जँग कून लीने एका गुणाची कमाई केली, मात्र विनोद कुमारला एकही पॉईंट मिळवता आला नाही. जी परिस्थिती बंगालच्या चढाईपटूंची तीच बचावपटूंची. रणसिंहचा अपवाद वगळता बंगालची बचावफळी अपयशी ठरली. त्यामुळे पुण्याच्या संघाला या सामन्यात विजय मिळवणं आणखीनचं सोपं झालं.