प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाच्या प्ले-ऑफच्या सामन्यांना आजपासून सुरुवात होणार आहे. तब्बल तीन महिने सुरु असलेल्या या हंगामात अनेक विक्रमांची नोंद करण्यात आली. अनेक नवीन चाहते यंदाच्या हंगामात प्रो-कबड्डीशी जोडले गेले. त्यामुळे या पर्वातील शेवटच्या सामन्यांची रंगत वाढवण्यासाठी प्रो-कबड्डीच्या सामन्याचं थेट प्रेक्षपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने एक अँथम साँग लाँच केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डुंपक डुंपक’ असे या गाण्याचे बोल असून प्रसिद्ध बॉलिवूड गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गीत लिहिलं आहे. या गाण्यात प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाचा आतापर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. राम संपथ यांनी या गाण्याला संगीत दिलेलं आहे.

अवश्य वाचा – प्रो-कबड्डीच्या प्ले-ऑफ फेरीचे दावेदार ठरले, पाहा कोणाला मिळाली संधी?

अवश्य वाचा – अशा पद्धतीने रंगतील प्रो-कबड्डीच्या प्ले-ऑफचे सामने; ‘या’ संघाला थेट अंतिम सामन्यात प्रवेश

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi season 5 star sports launch its new anthem song for the play off games watch video here