प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वातील नवोदीत संघ तामिळ थलायवाजने अखेरच्या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड केला आहे. गतविजेत्या पाटणा पायरेट्सला ४०-३७ अशा फरकाने पराभूत करुन तामिळ थलायवाजने आगामी पर्वात आपला संघ नव्या जोमाने उतरेल असा संदेश सर्वांना दिला आहे. पाटणा पायरेट्सच्या पराभवामुळे बंगाल वॉरियर्सने ‘ब’ गटात पहिलं स्थान पटकावलं आहे. या फेरीत पाटण्याला साखळी फेरीत आणखी एक सामना खेळायचा आहे, मात्र तरीही बंगालच्या पहिल्या स्थानाला ते धक्का लावू शकणार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तामिळ थलायवाजच्या संघासाठी आजच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार अजय ठाकूर. अजयने पहिल्या सत्रापासून आक्रमक खेळ करत सामन्यात चढाईत १४ गुणांची कमाई केली. त्याला के. प्रपंजनने ११ गुणांची कमाई करत तोलामोलाची साथ दिली. तामिळ थलायवाजच्या या जोडगोळीने सामन्याच्या पहिल्या मिनीटापासून आक्रमक खेळ करत पाटणा पायरेट्सची बचावफळी उध्वस्त केली. विशाल माने, सचिन शिंगाडे यासारख्या कसलेल्या बचावपटूंना अजय आणि प्रपंजनवर अंकुश लावणं जमतं नव्हतं. ज्याचा या दोन्ही खेळाडूंनी चांगलाच फायदा घेतला.

चढाईपटूंप्रमाणे तामिळ थलायवाजच्या बचावपटूंनीही आजच्या सामन्यात आपली चमक दाखवली. दर्शन, अमित हुडा आणि अनिल कुमार या त्रिकुटाने सामन्यात ९ गुणांची कमाई केली. पाटणा पायरेट्सकडून सामन्यात परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्णधार प्रदीप नरवालला सतत बाद करण्यात तामिळच्या या त्रिकुटाला यश आलं.

गतविजेत्या पाटणा पायरेट्सने मात्र या सामन्यात निराशाजनक खेळ केला. कर्णधार प्रदीप नरवाल आणि त्याचा साथीदार मोनू गोयतचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला आपली छाप पाडता आली नाही. प्रदीप नरवालने सामन्यात पाटण्याकडून एकाकी झुंज देत २० गुणांची कमाई केली. त्याला मोनू गोयतने ७ गुण मिळवत सामन्यात परतण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र बचावपटूंच्या निराशाजनर कामगिरीमुळे त्यांच्या प्रयत्नांवर पाणी पडलं.

विशाल माने, सचिन शिंगाडे आणि इतर बचावपटूंनी आज पाटण्याच्या प्रशिक्षकांना चांगलच निराश केलं. विशाल आणि सचिनचा खेळ पाहता प्रशिक्षक राममेहर सिंह यांनी पहिल्याच सत्रात दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंना बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतर संघात संधी मिळालेल्या इतर खेळाडूंनाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. जवाहर डागरने अखेरच्या सत्रात आपल्या संघासाठी ४ गुण मिळवले मात्र तोपर्यंत तामिळ थलायवाजने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली होती. तामिळ थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूरने या पर्वात चढाईत आपल्या संघासाठी २०० हून अधिक गुणांची कमाई केली. त्यामुळे पुढच्या सत्रात अजय ठाकूरचा हा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.