सांगलीच्या काशिलींग अडकेने शेवटच्या दहा सेकंदांमध्ये केलेल्या चढाईच्या जोरावर यू मुम्बाने जयपूर पिंक पँथर्सवर आपल्या घरच्या मैदानावर मात केली आहे. ३६-३२ अशा फरकाने मात करत यू मुम्बाच्या संघाने जयपूरकडून याआधी मिळालेल्या पराभवाचा वचपा काढलेला आहे. शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अनेक महत्वाचे क्षण आले. मात्र काशिलींग अडकेने बोनस गुणासह एका खेळाडूला बाद करुन केलेली रेड या सामन्याची निर्णायक रेड ठरली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जयपूरकडून पहिल्या सत्रात पवन कुमार आणि दुसऱ्या सत्रात जसवीर सिंह यांनी चांगला खेळ केला. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.
अवश्य वाचा – मुंबईला कमी लेखून चूक केलीत! अनुप कुमारचा हरियाणाला टोला
काशिलींग चमकला, दर्शन जाधवचीही उत्तम साथ –
सामन्याच्या सुरुवातीच्या सत्रात दोन्ही संघांच्या चढाईपटूंनी एकामागोमाग एक पॉईंट मिळवण्याचा धडाका सुरु ठेवला. मात्र या सामन्यात अनुप कुमारऐवजी काशिलींग अडकेने पॉईंट मिळवायला सुरुवात केली. ज्या खेळासाठी काशिलींग अडके ओळखला जातो, त्या दर्जाचा खेळ आज मुंबईत सामना पहायला आलेल्या क्रीडारसिकांना पहायला मिळाला. काशिलींगने पहिल्या सत्रापासून टो टच, हँड टच सारखे महत्वाचे पॉईंट मिळवत यू मुम्बाचं आव्हान सामन्यात नेहमी जिवंत ठेवलं.
नितीन मदने आणि शब्बीर बापूच्या गैरहजेरीत संघात स्थान मिळालेल्या श्रीकांत जाधवनेही आपली गुणवत्ता गेल्या काही सामन्यांमध्ये सिद्ध केली आहे. आजच्या सामन्यातही श्रीकांतने चढाईत ६ गुणांची कमाई केली. महत्वाची गोष्ट म्हणजे डू ऑर डाय रेडमध्ये श्रीकांतने अगदी सहज गुण मिळवत आपल्या संघावरचा भार कमी केला.
मुम्बाची बचावफळी पुन्हा कोलमडली, अनुपचा संयमी खेळ –
काल हरियाणाविरुद्ध सफाईदार खेळ केलेली यु मुम्बाची बचावफळी आजच्या सामन्यात मात्र ढेपाळली. सुरिंदर सिंहने घाईत खेळ करत पॉईंट गमावण्याचा सिलसिला या सामन्यातही कायम ठेवला. सुरिंदरमुळे पहिल्या सत्रात यु मुम्बाचा संघ एकदा ऑलआऊटही झाला. मात्र अखेरच्या सत्रात सुरिंदर आणि कुलदीपने काही चांगले पॉईंट मिळवत संघाच्या विजयात आपला हातभार लावला.
बचावपटूंकडून होत असलेल्या चुका लक्षात घेता कर्णधार अनुप कुमारने आज संयमी खेळाचं प्रदर्शन केलं. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात अनुपने डावा कोपरारक्षक हादी ओश्तनोकची जागा बदलत स्वतःला त्या जागेवर आणलं. तर अतताई खेळ करुन पॉईंट गमावणाऱ्या सुरिंदर सिंहला आपल्यासोबत साखळीमध्ये उभं करत संघाची अजून होऊ शकणारी पडझड थांबवली. अखेरच्या सत्रात बदली खेळाडू म्हणून आलेल्या एन.रणजीतनेही जसवीर सिंहला टॅकल करत संघासाठी महत्वाचे दोन पॉईंट मिळवले.
पवन कुमार आणि जसवीर सिंहचा आश्वासक खेळ –
जयपूर पिंक पँथर्सकडून पवन आणि जसवीरने यू मुम्बाला चांगली टक्कर दिली. पहिल्या सत्रात पवन कुमार यू मुम्बासाठी प्रत्येक वेळा डोकेदुखी ठरला. पहिल्या सत्रात पवनने आपल्या प्रत्येक चढाईत गुण मिळवत संघाला काही क्षणांसाठी आघाडी मिळवून दिली.
मनजीत छिल्लरच्या जागी संघाचं कर्णधारपद भूषवणाऱ्या जसवीर सिंहला पहिल्या सत्रात आपली छाप पाडता आली नाही. मात्र दुसऱ्या सत्रात यू मुम्बाच्या बचावपटूंनी पवन कुमारला बाद केल्यानंतर जसवीरने सामन्याची सुत्र आपल्या हातात घेतली. अखेरच्या सत्रात मॅरेथॉन रेड करत जसवीरने ६ गुणांची कमाई केली. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये सुरिंदरने जसवीरची पकड करत सामना यू मुम्बाच्या नावे केला.
जयपूरची बचावफळी निष्रभ –
बचावफळीची निष्क्रीयता जयपूरच्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरली आहे. अनुभवी खेळाडू सोमवीर शेखरला यू मुम्बाच्या चढाईपटूंनी सहज लक्ष्य बनवलं. त्यामुळे मुम्बाच्या चढाईपटूंना वेसणं घालण्याचं काम जयपूरला करता आलं नाही. उजव्या आणि डाव्या कोपऱ्यातील खेळाडूंनी काही पॉईंट मिळवलेही, मात्र संघाला सामना जिंकवून देण्यात ते पुरेसे ठरले नाहीत.
घरच्या मैदानातील अखेरच्या सामन्यात मिळालेल्या विजयामुळे यू मुम्बाने पुणेरी पलटणला मागे टाकत गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलेलं आहे. या स्पर्धेत इंटर झोन प्रकारात मुम्बाचा पुढचा सामना बंगाल वॉरियर्सशी होणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये यू मुम्बाचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.