घरच्या मैदानावर खेळताना उत्तर प्रदेश योद्धाज संघाला आज सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. काल यू मुम्बाने पिछाडी भरुन काढत उत्तर प्रदेशला पराभूत केलं होतं. आज हरियाणा स्टिलर्सच्या संघानेही जिगरबाज खेळाचं प्रदर्शन करत उत्तर प्रदेशला ३६-२९ अशी मात दिली. सामन्यात एका क्षणापर्यंत उत्तर प्रदेशचा संघ आघाडीवर होता, मात्र हरियाणाच्या चढाईपटूंनी मोक्याच्या क्षणी सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं आणि सामन्यावर आपली मोहोर उमटवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हरियाणा स्टिलर्स संघाकडून आजच्या सामन्याचा हिरो ठरला तो युवा चढाईपटू विकास कंडोला. दुसऱ्या सत्रात सामन्याचं पारडं हरियाणाच्या बाजूने झुकवण्यात या खेळाडूचा वाटा आहे. उत्तर प्रदेशच्या बचावफळीतील महत्वाच्या खेळाडूंना आपलं लक्ष्य बनवत विकासने उत्तर प्रदेशच्या योद्ध्यांना मोक्याच्या क्षणी धक्के द्यायला सुरुवात केली. यातून सावरण्याची संधी उत्तर प्रदेशला मिळाली नाही. विकास कंडोलाला अनुभवी चढाईपटू वझीर सिंहने ४ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली.

हरियाणाच्या बचावपटूंनीही आज आश्वासक खेळ केला. कर्णधार सुरिंदर नाडाने डाव्या कोपऱ्यावर खेळताना बचावात ७ गुणांची कमाई केली. उत्तर प्रदेशचा कर्णधार नितीन तोमर, रिशांक देवाडीगा यांच्यासारख्या महत्वाच्या खेळाडूंना सुरिंदरने आपल्या जाळ्यात अडकवलं. त्याला संघातील इतर खेळाडूंनीही तितकीच चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – तेलगू टायटन्सला अखेर सूर गवसला, यू मुम्बावर मात

उत्तर प्रदेशच्या संघाने आजच्या सामन्यातला पहिल्या सत्रात आपलं वर्चस्व गाजवलं होतं. मात्र दुसऱ्या सत्रात आपल्या कामगिरीत सातत्य राखणं त्यांना काही जमलं नाही. कर्णधार नितीन तोमरने सामन्यात चढाईमध्ये ५ गुण मिळवले, तर रिशांक देवाडीगानेही ६ गुणांची कमाई केली. मात्र दुसऱ्या सत्रात महत्वाच्या वेळी दोघांनाही संघाबाहेर बसवण्यात हरियाणाची बचावफळी यशस्वी ठरली. त्यामुळे अखेरच्या काही मिनीटांमध्ये उत्तर प्रदेशच्या संघावरचा दबाव वाढला, ज्याचा फायदा हरियाणाच्या संघाने पुरेपूर उचलला.

राजेश नरवालला संघात न मिळालेली जागा ही उत्तर प्रदेशच्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरली. मोक्याच्या क्षणी राजेश नरवाल बचावात आणि चढाईत महत्वाचे खेळाडू आऊट करतो, आतापर्यंतच्या सामन्यात त्याने केलेली कामगिरी सर्वांनी पाहिलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात राजेश नरवालला संघात जागा न देण्याचा निर्णय अनाकलनीय होता. राजेश नरवालच्या अनुपस्थिती संघात जागा मिळालेल्या सागर कृष्णाने चांगली कामगिरी केली, मात्र जीवा कुमार आणि इतर बचावपटूंची त्याला हवी तशी साथ मिळू शकली नाही. त्यामुळे हातात आलेला सामना यूपी योद्धाजला हरियाणा स्टिलर्सच्या संघाला बहाल करावा लागला.

घरच्या मैदानावर उत्तर प्रदेशचा हा दुसरा पराभव ठरला. याआधी घरच्या मैदानावर तेलगू टायटन्सला सलग ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आपल्या संघावर ही वेळ येऊ नये यासाठी उत्तर प्रदेशच्या व्यवस्थापनाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.