प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात लखनऊमध्ये रंगलेल्या सामन्यात यू मुम्बाने यूपी योद्धाजवर ३७-३४ अशी मात केली. पाचव्या सामन्यातला यू मुम्बाचा हा तिसरा विजय ठरला. मुम्बाच्या संघासाठी आजच्या सामन्यातली अश्वासक बाब म्हणजे अनुप कुमार आणि शब्बीर बापू ही जोडी फॉर्मात आली. त्यामुळे सामन्यात २ वेळा ऑलआऊट होऊनही मुम्बाने पुन्हा त्याच जोशात सामन्यामध्ये पुनरागमन केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उत्तर प्रदेशकडून रिशांक देवाडीगाने आक्रमक खेळ केला. त्याला कर्णधार नितीन तोमरनेही तितकीच चांगली साथ दिली. मात्र अखेरच्या सत्रात मुम्बाच्या बचावपटूंच्या खेळासमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही.
शब्बीर बापू फॉर्मात, अनुप कुमारची भक्कम साथ –
यू मुम्बासाठी पहिल्या तीन पर्वांमध्ये हिरो ठरलेला शब्बीर बापू आजच्या सामन्यात फॉर्मात परतला. संपूर्ण सामन्यात शब्बीरने चढाई आणि बचाव मिळून १३ गुणांची कमाई केली. उत्तर प्रदेशने सामन्याची सुरुवात आक्रमक करत सुरुवातीच्या काही मिनीटांमध्येच मुम्बाला ऑलआऊट केलं होतं. मात्र याचं दडपण न घेता शब्बीर बापून आक्रमक चढाया करत उत्तर प्रदेशला कोणत्याही क्षणी वरचढ होऊ दिलं नाही. उत्तर प्रदेशच्या बचावफळीला खिंडार पाडत शब्बीरने मुम्बासाठी काही चांगले पॉईंट मिळवले.
शब्बीरला अनुप कुमारनेही आज चांगली साथ दिली. महत्वाच्या क्षणी आपल्या संघावर आलेलं ऑलआऊटचं संकट टाळत अनुप कुमारने मुम्बाचं आव्हान सामन्यात कायम ठेवलं.
पाचव्या पर्वाला खराब पंचगिरीचं ग्रहण –
प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात अनेक संघांनी पंचांच्या निर्णयाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. पंचांच्या अशाच काही निर्णयाचा प्रत्यय आजच्या सामन्यातही पहायला मिळाला. सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये उत्तर प्रदेशच्या रिशांक देवाडीगाला मुम्बाच्या बचावपटूंनी बाहेर डॅश केलं. मात्र पंचांनी मुम्बाच्या ३ खेळाडूंना बाद केलं. यावर पंचांच्या निर्णयाला मुम्बाचा कर्णधार अनुप कुमारने आव्हान दिलं, टिव्ही रिप्लेमध्ये रिशांक देवाडीगा हा लॉबीच्या बाहेरुन कोर्टची मध्यरेषा पार करत असल्याचं दिसत असतानाही, तिसऱ्या पंचांनी उत्तर प्रदेशच्या बाजूने निर्णय दिला.
पंचांच्या अशा साशंक निर्णयाचा फटका उत्तर प्रदेशच्या संघालाही बसला. दुसऱ्या सत्रात मुंबईचा चढाईपटू शब्बीर बापूला यूपीच्या बचावपटूंनी आपल्या जाळ्यात ओढलं. यावेळी शब्बीरचा हात हा मध्यरेषेवर होता, रिप्लेमध्ये त्याने मध्य रेषा पार केली नसल्याचं दिसत असतानाही तिसऱ्या पंचांनी निर्णय मुम्बाच्या संघाच्या बाजूने देत यूपीला धक्का दिला. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांना या खराब पंचगिरीचा फटका सहन करावा लागला.
मुम्बाच्या बचावफळीतला सुरिंदर सिंह पुन्हा चमकला –
आजच्या सामन्यात दोन्ही संघासाठी महत्वाचं काम हे त्यांच्या चढाईपटूंनीच केलं. मात्र अशा परिस्थितीतही चढाईपटूंनी आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान केलं. मुम्बाकडून सुरिंदर सिंहने आजच्या सामन्यात बचावफळीत ५ गुणांची कमाई केली. पहिल्या सत्रात सुरिंदरच्या उतावळ्या खेळाचा मुम्बाला अनेकवेळा फटकाही बसला. मात्र दुसऱ्या सत्रात सुरिंदरने याची भरपाई केली.
महत्वाची बाब म्हणजे उत्तर प्रदेशच्या फॉर्मात असलेल्या रिशांक देवाडीगा आणि कर्णधार नितीन तोमरच्या चढायांवर अंकुश लावण्यात सुरिंदरला यश आलं. दुसऱ्या सत्रात बॅकहोल्ड, डॅश अशी आपल्या भात्यातली अस्त्र वापरत सुरिंदरने उत्तर प्रदेशच्या संघावर प्रहार केला.
यूपीचे रिशांक-नितीन फॉर्मात, बचावपटूंचीही उत्तम साथ –
पहिली ४ पर्व यू मु्म्बाच्या संघाचा अविभाज्य भाग असलेल्या रिशांक देवाडीगाने आज उत्तर प्रदेशकडून खेळताना खोऱ्याने गुण मिळवले. चढाईमध्ये रिशांक देवाडीगाने आज १४ गुणांची कमाई केली. आजच्या सामन्यात रिशांकने तब्बल २ वेळा यू मुम्बाच्या ३ खेळाडूंना बाद केलं. मात्र दुसऱ्या सत्रात त्याच्यावर मुम्बाच्या बचावपटूंनी चांगलाच अंकुश ठेवला.
नितीन तोमरनेही आज आपल्या कर्णधारपदाला साजेसा खेळ करत चढाईमध्ये ८ गुण मिळवले. दुसऱ्या सत्रात मुम्बाच्या संघाकडे आघाडी असताना नितीन तोमरने लागोपाठ ३ गुणांची कमाई करत आपल्या संघावरच दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शब्बीर आणि अनुपच्या खेळापुढे अखेरच्या मिनीटात त्याची डाळ शिजू शकली नाही. याव्यतिरीक्त पंकज, राजेश नरवाल आणि जिवा कुमारनेही आजच्या सामन्यात बचावफळीत काही चांगले गुण मिळवले.
याव्यतिरीक्त यू मुम्बाकडून बदली खेळाडू दर्शन कलियानने अखेरच्या सत्रात चढाईत ४ गुणांची कमाई करत अनुप आणि शब्बीरच्या खांद्यांवरचं दडपण कमी केलं. मोठ्या कालावधीनंतर मुम्बाने तुल्यबळ संघावर विजय मिळवलेला असल्याने आगामी सामन्यांसाठी मुम्बाच्या आत्मविश्वासात नक्कीच भर पडली असणार आहे.