प्रो-कबड्डीचा पाचवा हंगाम आता हळूहळू उत्तरार्धाकडे झुकत चाललेला आहे. सोमवारी मुंबईच्या वरळी एनएसयुआयच्या मैदानावर प्ले-ऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी भारतासह देश-विदेशात कबड्डीला मिळणाऱ्या प्रसिद्धीला पाहता मुंबईच्या मैदानावर एक आगळा वेगळा सामना खेळवण्यात आला. क्रिकेटच्या मैदानात भारताकडून पराभव पत्करुन माघारी गेलेला ऑस्ट्रेलिया संघ आणि भारताच्या दौऱ्यावर आलेला न्यूझीलंड संघ यांच्यात कबड्डीचा सामना खेळवण्यात आला.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसी आणि न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिसने आपापल्या संघाचं नेतृत्व केलं. एकतर्फी झालेल्या या सामन्यात मायकल हसीच्या संघाने स्कॉट स्टायरिसच्या संघावर २२-६ अशी मात केली. क्रिकेटच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला भारताकडून पराभव स्विकारावा लागला होता, त्यामुळे निदान कबड्डीच्या मैदानात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याचा शेवट गोड केला असं म्हणायला हरकत नाही.
अवश्य वाचा – प्रो-कबड्डीच्या प्ले-ऑफ फेरीचे दावेदार ठरले, पाहा कोणाला मिळाली संधी?
अवश्य वाचा – प्रो-कबड्डीतल्या खेळाडूंचं आगळंवेगळं दिवाळी सेलिब्रेशन