प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात भारतीय खेळाडूंनी लिलावाच्या रकमेत एकामागोमाग एक विक्रम मोडण्याचा सपाटा चालूच ठेवला. पहिल्या दिवसाच्या लिलावात तब्बल ६ खेळाडूंना १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बोली लागली आहे. दिवसाच्या अखेरीस पटणा पायरेट्सचा माजी खेळाडू मोनू गोयतवर, हरयाणा स्टिलर्सने १ कोटी ५१ लाखांची बोली लावली आहे. या बोलीसह मोनू प्रो-कबड्डीतला सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. मोनू गोयतने नितीन तोमर आणि दिपक हुडाचा विक्रम मोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्या पद्धतीने काही खेळाडूंना छप्परतोड रक्कम मिळाली, त्याप्रमाणे काही खेळाडूंना धक्काही बसला. अनुप कुमार, मनजीत छिल्लर, वझीर सिंह यांसारख्या खेळाडूंना किरकोळ रकमेत समाधान मानावं लागलं. गेल्या ५ वर्षांपासून यू मुम्बा आणि अनुप कुमारचं असलेलं नात या हंगामात तुटलेलं आहे. यंदाच्या हंगामात कॅप्टन कुल अनुप कुमार जयपूर पिंक पँथर्स संघाकडून खेळणार आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी उरलेल्या खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. त्यामुळे उरलेले खेळाडू मोनू गोयतचा विक्रम मोडू शकतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पहिल्या दिवशी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंची माहिती खाली नमूद केलेली आहे.

  • मोनू गोयत हरयाणा स्टिलर्स संघाकडून १ कोटी ५१ लाखांची बोली
  •  तेलगू टायटन्सने राहुलला कायम राखलं
  • १ कोटी २९ लाखांच्या बोलीसह राहुल चौधरी ठरला सर्वात महागडा खेळाडू
  • सुकेश हेगडे २८ लाखांच्या बोलीवर तामिळ थलायवाज संघाकडून खेळणार
  • के. प्रपंजन ३८ लाखांच्या बोलीवर गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाकडून खेळणार
  • मुंबईचा रिशांक देवाडीगा १ कोटी ११ लाखांच्या बोलीवर उत्तर प्रदेश संघाकडूनच खेळणार
  • वझीर सिंह २० लाखांच्या बोलीवर हरयाणा स्टिलर्स संघाकडून खेळणार
  • श्रीकांत जाधववर ३८ लाखांची बोली, सहाव्या हंगामात उत्तर प्रदेश योद्धाजकडून खेळणार
  • अनुप जयपूरच्या संघाकडून खेळणार
  • यू मुम्बा आणि अनुप कुमारचं नातं तुटलं, सहाव्या हंगामात अनुपवर ३० लाखांची बोली.
  • पुणेरी पलटणकडून नितीनवर १ कोटी १५ लाखांची बोली
  • नितीन तोमरची दिपक हुडाच्या विक्रमाशी बरोबरी
  • संदीप कुमार ६६ लाखांच्या बोलीवर जयपूर पिंक पँथर्स संघाकडून खेळणार
  • सुरिंदर नाडा ७५ लाखांच्या बोलीवर हरयाणा स्टिलर्स संघाकडू खेळणार
  • महेंदर सिंह ४० लाखांच्या बोलीवर बंगळुरु बुल्स संघाकडून खेळणार
  • मोहित छिल्लर ५८ लाखांच्या बोलीवर जयपूर पिंक पँथर्स संघाकडून खेळणार
  • जिवा कुमार ४५ लाखांच्या बोलीवर उत्तर प्रदेश योद्धाज संघाकडून खेळणार
  • परवेश भैंसवाल ३५ लाखांच्या बोलीवर पुन्हा एकदा गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाकडून खेळणार
  • दिपकने आजच्याच दिवश फैजल अत्राचलीचा १ कोटीच्या बोलीचा विक्रम मोडला
  • प्रो-कबड्डीत १ कोटींचा टप्पा ओलांडणारा दिपक हुडा पहिला खेळाडू
  • अखेर जयपूरची बाजी, १ कोटी १५ लाखांच्या बोलीवर दिपक हुडा जयपूर पिंक पँथर्सकडून खेळणार
  • दिल्लीच्या संघाची माघार, आताा जयपूर-हरयाणात झुंज
  • दिपक निवास हुडासाठी हरयाणा, दिल्ली, जयपूर संघामध्ये चढाओढ
  • कुलदीप सिंह २२ लाखांच्या बोलीवर पाटणा पायरेट्स संघाकडून खेळणार
  • मोठी बातमी, मनजित छिल्लर तामिळ थलायवाज संघाकडून अवघ्या २० लाखांच्या बोलीवर खेळणार
  • श्रीकांत तेवतिया २५ लाखांच्या बोलीवर बंगाल वॉरियर्स संघाकडे
  • अष्टपैलू रणसिंह ४३ लाखांच्या बोलीवर बंगाल वॉरियर्स संघाकडे
  • इराणचा हादी ताजिक ११ लाखांच्या बोलीवर यू मुम्बाकडे
  • कोरियाचा सिआँर रिऑल कीम ८ लाखांच्या बोलीवर उत्तर प्रदेश योद्धा संघाकडे
  • इराणचा अबुफजल मग्शदुलू २१ लाखांच्या बोलीवर यू मुम्बा संघाकडे
  • इराणचा फरहाद रहिमी २१ लाखांच्या बोलीवर तेलगू टायटन्सकडे
  • इराणचा हादी ओश्तनोक १२ लाखांच्या बोलीवर गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाकडे
  • जँग कून ली ३३ लाखांच्या बोलीवर बंगाल वॉरियर्स संघाकडे, एफबीएम कार्डाद्वारे राखलं आपल्या संघात
  • प्रो-कबड्डीच्या हंगामातली पहिली कोट्यवधी रुपयांची बोली
  • १ कोटी रुपयांच्या बोलीवर फैजल अत्राचली यू मुम्बा संघाकडे
  • इराणच्या फैजल अत्राचलीसाठी संघमालकांमध्ये चढाओढ
  • अखेर तेलगू टायटन्सने मारली बाजी, ७६ लाखांच्या बोलीवर अबुझार मेघानी तेलगू टायटन्स संघाकडे
  • अबुझार मेघानीने ओलांडला ५० लाखांचा टप्पा, अबुझारची १ कोटीच्या बोलीकडे वाटचाल
  • इराणच्या अबुझार मेघानीसाठी संघमालकांमध्ये चढाओढ
  • स्थानिक कबड्डीपटूंनंतर परदेशी खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात