गेली ५ पर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रो-कबड्डीचा सहावा हंगाम लवकरच क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येतो आहे. ५ ऑक्टोबरपासून सहाव्या हंगामाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. नुकतच सहाव्या हंगामाच्या वेळापत्रकाची आयोजकांकडून घोषणा करण्यात आली. चेन्नईत तामिळ थलायवाज विरुद्ध तेलगू टायटन्स या सामन्याने सहाव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.

याचसोबत यंदाच्या हंगामाचा अंतिम सामना हा मुंबईमध्ये खेळवला जाणार आहे. ९ ते १५ नोव्हेंबर या काळात मुंबईकरांना हे सामने प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहता येणार आहेत. तर पुण्यातील कबड्डीप्रेमींना १९ ते २४ ऑक्टोबरदरम्यान प्रो-कबड्डीचा आनंद घेता येणार आहे.

असं असेल सहाव्या पर्वाचं वेळापत्रक –

चेन्नई – ५ ते ११ ऑक्टोबर २०१८

सोनीपत – १२ ते १८ ऑक्टोबर २०१८

पुणे – १९ ते २४ ऑक्टोबर २०१८ (इंटरझोन आठवडा)

पाटणा – २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर (इंटरझोन आठवडा)

नोएडा, उत्तर प्रदेश – २ ते ८ नोव्हेंबर २०१८

मुंबई – ९ ते १५ नोव्हेंबर २०१८

अहमदाबाद – १६ ते २२ नोव्हेंबर २०१८ (इंटरझोन आठवडा)

बंगळुरु – २३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०१८

दिल्ली – ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१८ (इंटरझोन आठवडा)

हैदराबाद – ७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८ (इंटरझोन आठवडा)

जयपूर – १४ डिसेंबर ते २० डिसेंबर

कोलकाता – २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर (वाईल्ड कार्ड आठवडा)

कोची – ३० डिसेंबर २०११८ क्वालिफायर १ आणि २
३१ डिसेंबर २०१८ – क्वालिफायर ३ आणि एलिमीनेटर १

मुंबई – ३ जानेवारी दुसरा एलिमीनेटर सामना
५ जानेवारी अंतिम सामना