प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात तेलगू टायटन्सची सुरुवात फारशी चांगली झालेली नाहीये. घरच्या मैदानावर तेलगू टायटन्सला सलग ३ पराभवांचा सामना करावा लागला. दबंग दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तेलगूचा संघ ३३-३४ अशा एका गुणाच्या फरकाने पराभूत झाला. मात्र या पराभवानंतरही तेलगू टायटन्स संघाच्या नावावर एक अनोखा विक्रम जमा झाला आहे.
अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 :धाकट्या भावाला मागे टाकत मोठ्या भावाची बाजी, सूरज देसाईचा विक्रम
तेलुगू टायटन्सने प्रो कबड्डीमध्ये चढाईत २ हजार गुणांचा पल्ला पार केला. त्यामुळे हा मोठा टप्पा पार करणारा तेलुगू टायटन्स दुसराच संघ ठरला. याआधी सहाव्या हंगामात पाटणा पायरेट्सने हा पल्ला पूर्ण केला होता. सध्या पाटणा पायरेट्सच्या खात्यात चढाईत २२८३ गुण आहेत.
कालच्या सामन्याआधी तेलुगू टायटन्सच्या खात्यात चढाईचे १९८६ गुण होते. त्यामुळे त्यांनी दबंग दिल्लीविरुद्ध चढाईत २७ गुण मिळवत चढाईत २ हजार गुणांचा पल्ला पार केला. २७ पैकी २६ गुण तर सुरज आणि सिद्धार्थ या देसाई बंधूनी मिळवले. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सुरज देसाईने प्रो कबड्डीत पदार्पण करताना सर्वाधिक १८ गुण मिळवले. तर दिल्लीकडून नवीन कुमारने सर्वाधिक १४ गुण मिळवले.
प्रो कबड्डीमध्ये चढाईत सर्वाधिक गुण मिळणारे संघ –
पाटणा पायरेट्स- २२८३
तेलुगू टायटन्स- २०११
यू मुम्बा- १९७६
बंगळुरू बुल्स- १९२७
बंगाल वॉरियर्स- १८३४