प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात बुधवारी हैदराबाद येथे खेळवण्यात आलेला तेलगू टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली सामना, हा कोल्हापूरच्या देसाई बंधुनी दिलेल्या झुंजीमुळे क्रीडा रसिकांना लक्षात राहणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीने तेलगू टायटन्सवर एका गुणाच्या फरकाने मात केली. यजमान तेलगू टायटन्सकडून मराठमोळ्या सूरज आणि सिद्धार्थ देसाई यांनी प्रयत्नांची शर्थ केली, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. मात्र प्रो-कबड्डीचा आपला पहिला हंगाम खेळणाऱ्या सूरज देसाईने पहिल्याच सामन्यात विक्रमाची नोंद केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रो-कबड्डीच्या इतिहासात पहिल्याच सामन्यात चढाईमध्ये सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम आता सूरज देसाईच्या नावावर जमा झाला आहे. सूरजने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चढाईमध्ये १८ गुणांची कमाई केली. सूरजने आपला भाऊ सिद्धार्थ देसाईचा १५ गुणांचा विक्रम मोडीत काढला. सहाव्या हंगामात सिद्धार्थने या विक्रमाची नोंद केली होती. त्यामुळे या यादीत पहिल्या दोन स्थानांवर मराठमोळ्या देसाई बंधूनी आपलं स्थान मिळवलं आहे.

पदार्पणाच्या सामन्यात चढाईत सर्वाधिक गुण मिळवणारे खेळाडू –

१) सूरज देसाई – १८ गुण

२) सिद्धार्थ देसाई – १५ गुण

३) राकेश कुमार – १५ गुण

अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 : तेलगू टायटन्सचा तिसरा पराभव, देसाई बंधूंची झुंज अपयशी

तेलगू टायटन्सची यंदाच्या हंगामातली सुरुवात फारशी चांगली झालेली नाहीये. घरच्या मैदानावर तेलगू टायटन्सला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे आगामी सामन्यात हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.