भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आता नवीन इनिंगला सुरुवात करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेला. यानंतर गौतम गंभीर आता कबड्डीच्या मैदानात दिसणार आहे. प्रो-कबड्डीतील संघ युपी योद्धाने गौतम गंभीरची आपल्या संघाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषणा केली आहे.

खुद्द गौतमने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे.

यूपी योद्धा संघात रिशांक देवाडीगा, श्रीकांत जाधव, नितेश कुमार असे नावाजलेले खेळाडू आहेत. मात्र या संघाला अद्याप प्रो-कबड्डीचं विजेतेपद पटकावता आलेलं नव्हतं. त्यामुळे यंदा हा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader