Pro League Hockeyराऊरकेला : जागतिक हॉकी स्पर्धेतील अपयशानंतर भारताने जगज्जेत्या जर्मनीलाच पराभूत करून प्रो लीग हॉकीच्या नव्या हंगामास शुक्रवारी सनसनाटी सुरुवात केली. आता दुसऱ्या सामन्यात रविवारी त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार असून, भारतीय संघासमोर सातत्य राखण्याचे आव्हान असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक हॉकी स्पर्धेत भारताला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. हे अपयश पचवून भारतीय पुरुष खेळाडू हंगामी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रो लीगमध्ये उतरले तेव्हा भारताकडून किमान कामगिरीची अपेक्षा बाळगली गेली. मात्र, पहिल्याच सामन्यात भारतीय खेळाडूंनी जगज्जेत्या जर्मनीला ३-२ असे पराभूत केले होते.