मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ तालुक्यात कायम दहशतीचे वातावरण असते. सीमारेषेच्या दोन्ही भागातून होणारा गोळीबार हा तेथील लोकांसाठी नित्यनेमाची बाब झाली आहे. अशा परिस्थितीतही आई-वडिलांचे स्वप्न साकार करत साकलेन तारीक याने देशाचे प्रतिनिधित्व केले. आता प्रो व्हॉलीबॉल लीगमध्येही तो दमदार कामगिरी करत आहे. प्रो व्हॉलीबॉल लीगमुळे देशातील व्हॉलीबॉल या खेळाला चालना मिळेल, असे मत यू मुंबा व्हॉली संघाचा खेळाडू साकलेन तारीक याने व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तो म्हणाला, ‘‘माझा आतापर्यंतचा खडतर राहिला आहे. लहान वयातच मला घर सोडावे लागले होते. अनेक गोष्टींशी मला तडजोड करावी लागत होती. मात्र त्यातही मला घरच्यांकडून भक्कम पाठिंबा मिळत होता. घरात सर्वच जण व्हॉलीबॉल खेळत असल्यामुळे मी देशाचे प्रतिनिधित्व करावे, ही माझ्या वडिलांची इच्छा होती. ती मी पूर्ण केली आहे.’’

प्रो व्हॉलीबॉल लीगविषयी साकलेनने सांगितले की, ‘‘व्हॉलीबॉल या खेळात आक्रमकता असल्याने गुण मिळवण्यासाठी एकप्रकारचे द्वंद्व पाहायला मिळते. त्यामुळे लोकांच्या पसंतीस हा खेळ नक्कीच उतरेल आणि प्रो व्हॉलीबॉल लीगला लोकप्रियता मिळेल, अशी आशा आहे.’’