आज होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रस्ताव येण्याची शक्यता
वानखेडे स्टेडियमवर नव्याने बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त अशा पत्रकार कक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव दोन मान्यताप्राप्त क्लब्सनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) दिला आहे. शुक्रवारी होणाऱ्या एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर हा प्रस्ताव येण्याची शक्यता
आहे.
‘‘सात दिवसांपूर्वी खंडाळा क्रिकेट क्लब आणि हिंदुजा हॉस्पिटल क्रिकेट क्लबने हा प्रस्ताव वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दृष्टीने सादर केला आहे,’’ असे एमसीएचे सचिव नितीन दलाल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘‘हा प्रस्ताव सर्वप्रथम कार्यकारिणी समितीसमोर यायला हवा, मगच वार्षिक सर्वसाधारण सभेत. आता अध्यक्ष रवी सावंत याबाबत धोरण ठरवतील.’’
वानखेडे स्टेडियमवरील पत्रकार कक्षाला आतापर्यंत कोणाचेही नाव देण्यात आलेले नव्हते. एमसीएने विजय र्मचट, सुनील गावस्कर, रमेश दिवेचा आणि सचिन तेंडुलकर या खेळाडूंची नावे स्टँडला दिलेली आहेत. याचप्रमाणे पॉली उम्रीगीर आणि विनोद मंकड यांची नावे प्रवेशद्वाराला दिलेली आहेत, तर ड्रेसिंग रूमला विजय मांजरेकर यांचे नाव देण्यात आले आहे.
एमसीएच्या पत्रकार कक्षाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचा प्रस्ताव
वानखेडे स्टेडियमवर नव्याने बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त अशा पत्रकार कक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव दोन मान्यताप्राप्त क्लब्सनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) दिला आहे. शुक्रवारी होणाऱ्या एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर हा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
First published on: 22-03-2013 at 02:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposal to give shivsena supremo name to mca journalist box