पॅराऑलिम्पिकपटू ऑस्कर पिस्टोरियसवर खुनाचा आरोप असल्यामुळे त्याला नजरकैदेत ठेवण्याऐवजी तुरुंगात पाठविण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली आहे.
पिस्टोरियसवर प्रेयसी रीवा स्टीनकेम्प च्यिा हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. २०१३ मध्ये त्याच्या राहत्या घरीच ही घटना घडली होती व पिस्टोरियस दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्याला पंधरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली होती. मात्र या निर्णयाविरुद्ध त्याने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. एक वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात आली होती. सरकारी वकील गेरी नेल यांनी आपली बाजू मांडताना, पिस्टोरियसने रिवावर हत्येच्या हेतूनेच गोळ्या झाडल्या होत्या व त्याला नजरकैदेत ठेवण्याऐवजी तुरुंगात पाठविले पाहिजे अशी मागणी केली.

Story img Loader