रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख बृजभुषण सिंह आणि इतर प्रशिक्षकांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप काही भारतीय कुस्तीपटूंनी केला होता. याप्रकरणी जानेवारी महिन्यात जंतरमंतरवर जाऊन साक्षी फोगाट, बजरंग पुनियांसह अनेकांनी आंदोलनेही केली. परंतु, याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्ती संघातील टॉप कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा जंतरमंतरवर सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. बृजभूषण सिंह यांच्यासह इतर आरोपींवर कारवाई होत नाही तोवर इथून हटणार नसल्याची भूमिका त्यांनी आज जाहीर केली.

“जानेवारी महिन्यात हे प्रकरण उजेडात आल्यानंतर महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणी चौकशी करण्याकरता एका समितीची स्थापन करण्यात आली होती. या समितीने केंद्रीय क्रिडा मंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. परंतु, अहवाल अद्यापही सार्वजनिक करण्यात आलेला नाही, तसंच संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही”, अशी प्रतिक्रिया ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी दिली. “महिला कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणारा अहवाल सार्वजनिक व्हावा अशी आमची इच्छा आहे. हा एक संवेदनशील मुद्दा आहे, तक्रारकर्त्यांपैकी एक अल्पवयीन मुलगी आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
maharashtra election 2024 mahim vidhan sabha sada sarvankar viral video
VIDEO: “लाडकी बहीण सांगता मग…”, सदा सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप; म्हणाली, “घरात नको, तुम्ही बाहेरच…”
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
joe biden elon musk
Video: “मला ‘गे’ म्हणाले नी आता पार्श्वभागावर ‘चापट’ मारायचीय”, जो बायडेन यांची एलॉन ‘मस्क’री!

“ब्रजभूषणला अटक होत नाही तोवर आम्ही येथून जाणार नाही,” अशी भूमिका जागतिक कुस्ती स्पर्धेत चार मेडल मिळवणारे कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी जाहीर केली. वारंवार प्रयत्न करूनही सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विनेश फोगट यांनी सांगितले. “आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही इथेच जेवणार आणि झोपणार आहोत. आम्ही तीन महिन्यांपासून क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि इतर संबंधित प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. समितीचे सदस्य आम्हाला प्रतिसाद देत नाहीत, क्रीडा मंत्रालयाकडूनही काही सांगण्यात येत नाही. ते आमचे कॉलही उचलत नाहीत. आम्ही देशासाठी पदके जिंकली आहेत आणि यासाठी आमचे करिअर पणाला लावले आहे,” असं विनेश फोगाट यांनी पुढे स्पष्ट केले.

हेही वाचा >> IPL 2023 RR vs RCB: आयपीएलमध्ये ट्रेंट बोल्टचा मोठा धमाका! डेल स्टेनला मागे टाकत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला २१वा गोलंदाज

क्रीडा मंत्रालयाने २३ जानेवारी रोजी बॉक्सर एमसी मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीला एका महिन्यात त्याचे निष्कर्ष सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. नंतर, आंदोलक कुस्तीपटूंच्या आग्रहास्तव ही मुदत दोन आठवड्यांनी वाढवली आणि चौकशी पॅनेलमध्ये बबिता फोगटचा सहावा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर केला, परंतु मंत्रालयाने अद्याप त्याचे निष्कर्ष सार्वजनिक केलेले नाहीत.

“आम्ही संपलो आहोत म्हणून आम्ही आंदोलने करत आहोत, अशी आमच्यावर टीका केली जातेय. परंतु, आम्ही कुस्तीला वाचवण्याकरता, कुस्तीला सुरक्षित हातात ठेवण्याकरता आंदोलन करत आहोत. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की सत्याचा विजय होईल, आम्हाला खोटं पाडू नका”, असं म्हणत साक्षी मलिक भावूक झाल्या होत्या. त्यांच्या बाजूला असलेल्या विनिश फोगाट यांनाही यावेळी अश्रू अनावर झाले.

“आम्ही फक्त तक्रारी केल्या, पुरावे दिले नाहीत, असा आमच्यावर आरोप होतो आहे. मग त्यांनी त्यांची नार्को टेस्ट करावी. आम्ही चुकीचे असू तर देश आम्हाला जी शिक्षा देईल ती भोगायला आम्ही तयार आहोत. असं नाही की ते पॉवरफूल आहेत म्हणून आम्हाला न्याय मिळणार नाही. समितीतील काही लोक राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यामुळे फेवर दिला जात होता. मला नाही माहित आम्ही सांगू शकतो की नाही ते पण न्याय आम्हाला अजूनही मिळालेला नाही”, असंही विनिश फोगाट म्हणाल्या.