पीटीआय, नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्धचे आपले आंदोलन आता जागतिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न भारतीय कुस्तीगिरांनी सुरू केले असून, यासाठी त्यांनी अन्य देशांतील ऑलिम्पिकपटूंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. ‘‘आम्ही हे आंदोलन आता जागतिक पातळीवर नेणार आहे. आम्ही पाठिंबा मिळवण्यासाठी आता अन्य देशांतील ऑलिम्पिकपटू आणि ऑलिम्पिक पदकविजेत्यांना आवाहन करणार आहोत,’’ असे विनेश फोगटने सांगितले. कुस्तीगिरांच्या आंदोलनाचा सोमवारी २३वा दिवस होता.

‘‘आमच्या आंदोलनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथे काही लोकांना रेकॉर्डिग करायला, आमची छायाचित्रे काढायला पाठवले जात आहे. त्यांना थांबायला सांगितल्यास ते पळून जातात. काही अनोळखी महिलांनी आमच्या तंबूत झोपण्याचाही प्रयत्न केला. आम्हाला अनोळखी असलेल्या महिलांना पाठवून आमचे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न होत आहे. आम्हाला त्रास दिला जात आहे. सत्य आणि न्यायासाठी सुरू असलेल्या आमच्या लढय़ाला कलंकित करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’’ असेही विनेशने सांगितले.

IFA Officer Apala Mishra Success Story
UPSC परीक्षेत दोनदा अपयश, मित्रांकडून चेष्टामस्करी होऊनही हार मानली नाही; वाचा, कसा होता IFS अधिकारी अपाला मिश्रा यांचा प्रवास?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Karnataka man return to india from russia
“आम्ही भारतात जिवंत परत येऊ असं वाटलं नव्हतं”; रशिया-युक्रेन युद्धात लढलेल्या कर्नाटकच्या तिघांनी सांगितली आपबीती!
News About Dhaba
Dhaba Name : ‘मुस्लीम’ मालकानं ढाब्याचं ‘हिंदू’ नाव धमक्यांमुळे बदललं, नेमकी घटना काय?
Australia and Canada Visa Curbs Hit indian Students Hard
विश्लेषण : परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांची कोंडी का? स्थलांतरितविरोधी भावनेचा फटका?
namibia will cull elephant
Drought In Namibia : दुष्काळग्रस्तांना अन्न पुरवण्यासाठी ‘हा’ देश करणार ८३ हत्तींची हत्या; सरकारने काढले आदेश!
pradhan mantri jan dhan yojana latest marathi news
आर्थिक उन्नतीचे ‘जनधन’
Loksatta Chatura What exactly is the Drone Pilot Scheme for Women
महिलांसाठीची ड्रोन पायलट योजना नेमकी काय आहे ?

‘‘आम्हाला आता जंतरमंतरवर एका कोपऱ्यात ढकलले जात आहे असे वाटू लागले आहे. मात्र, आम्ही डगमगणार नाही. आम्ही आता जागतिक पातळीवर हा लढा घेऊन जाणार आहोत,’’ असे विनेश म्हणाली.

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यासाठी आम्ही २१ मेपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत निर्णय न झाल्यास आम्ही आंदोलन अधिक व्यापक करू.

– विनेश फोगट