पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या तयारीच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्ष जेरोम वाल्के ब्राझील दौऱ्यावर आले असताना निदर्शकांनी क्युआबाच्या मध्यवर्ती शहरात जोरदार घोषणाबाजी करून मिळणाऱ्या मजुरीत वाढ करण्याची मागणी केली.
विश्वचषक स्पर्धा होणार असलेल्या १२ ठिकाणांपैकी एक अरेना पॅन्टानाल येथे मोठय़ा प्रमाणावर शिक्षक, विद्यार्थी आणि काही कामगार जमले होते. त्यावेळी निदर्शकांनी घोषणाबाजी केली. ब्राझीलचे क्रीडामंत्री अल्डो रिबेलो तसेच महान फुटबॉलपटू रोनाल्डो आणि बेबेटो यांच्यासमवेत वाल्के एका कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यावेळीही निदर्शकांनी आपली नाराजी प्रकट केली. ‘फिफा चले जाव’, ‘विश्वचषक नको, प्रगत शिक्षण हवे,’ अशा घोषणा निदर्शकांनी केल्या.
फिफा विश्वचषकाची तयारी पूर्ण करण्यासाठी ब्राझीलला डिसेंबपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. क्युआबा स्टेडियमचे बांधकाम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षी जूनआधी सज्ज राहण्यासाठी ब्राझीलवर दडपण आणण्याकरिता हा दौरा होता, असे वाल्के यांनी सांगितले.
फिफाच्या ब्राझील दौऱ्यादरम्यान जोरदार निदर्शने
पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या तयारीच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्ष जेरोम वाल्के ब्राझील दौऱ्यावर आले
First published on: 10-10-2013 at 04:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protests during latest fifa brazil visit