केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प मांडताना पुढील आर्थिक वर्षांसाठी क्रीडा क्षेत्रासाठी २८२६.९२ कोटींची तरतूद केली आहे. २०१९-२०च्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची वाढ सुचवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

*  ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमांतर्गत देशातील विविध भागांत युवकांच्या क्रीडा विकासासाठी २९१.४२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

*  राष्ट्रीय क्रीडा संघटनांना देण्यात येणाऱ्या निधीत ५५ कोटी रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गतवर्षी ३००.८५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती. ताज्या अर्थसंकल्पात मात्र २४५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

*  क्रीडापटूंच्या भत्त्यांमध्येही कपात करण्यात आली असून १११ कोटींवरून हा आकडा ७० कोटींपर्यंत खाली आणण्यात आला आहे.

*   राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसुद्धा ७७.१५ कोटींवरून ५० कोटींपर्यंत खाली आणण्यात आला आहे.

*  भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) निधीमध्येही कपात केली असून, ६१५ कोटींवरून हा निधी ५०० कोटींपर्यंत कमी करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Provision of rs 2827 92 crore for the sports sector in the budget abn