लाहोर कलंदर्स संघाने पाकिस्तान सुपर लीग २०२२चे विजेतेपद पटकावले. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली लाहोर संघाने रविवारी इतिहास रचला. यासह त्याने आपला होणारा सासरा आणि दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला चुकीचे सिद्ध केले आहे.
शाहीन शाह आफ्रिदीला लाहोर कलंदर्सने कर्णधार बनवल्यावर शाहिद आफ्रिदीने त्यावर भाष्य केले होते. शाहीनने आता नेतृत्व करू नये, कारण त्याच्या गोलंदाजीवर काम करण्याची हीच वेळ आहे, असे शाहिदने म्हटले होते. पण आता शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली लाहोर कलंदर्सने जेतेपद पटकावले तेव्हा शाहिद आफ्रिदी म्हणाला, ”मी शाहीनला कर्णधार होण्यास नकार दिला, पण तोही आफ्रिदी असल्यामुळे त्याने माझे ऐकले नाही. मला वाटते की शाहीनने माझे ऐकले नाही हे आश्चर्यकारक आहे.”
हेही वाचा – IND vs SL : आपल्या १००व्या कसोटीसाठी विराटनं सुरू केला सराव; स्टेडियममधील VIDEO झाला व्हायरल!
शाहीन आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोणत्याही संघाचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण कर्णधार ठरला आणि त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच संघ चॅम्पियन बनला. लाहोर कलंदर्सचे हे पहिले पीएसएल विजेतेपद आहे.
पीएसएल २०२२च्या अंतिम सामन्यात लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजी करताना १८० धावा केल्या. मोहम्मद हाफिजने ६९ धावांची शानदार खेळी केली, प्रत्युत्तरात मुलतान सुलतानचा संघ अवघ्या १३८ धावांवर सर्वबाद झाला. शाहीन आफ्रिदीचा साखरपुडा शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सासोबत झाला. आता लवकरच शाहीन-अक्सा लग्न करणार आहेत.