Rilee Rossouw Century PSL 2023: पाकिस्तान सुपर लीग २०२३चा २७वा सामना १० मार्च रोजी पेशावर झल्मी आणि मुलतान सुलतान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुलतानच्या संघाने टी२० मधील नवीन विक्रम प्रस्थापित करत २४३ धावांचा यशस्वी पाठलाग करून पेशावरचा ४ विकेट्सने पराभव केला. पेशावर झल्मीने पहिल्या डावात ४ बाद २४२ धावा केल्या. मुलतान सुलतानने दिलेले २४३ धावांचे लक्ष्य ६ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. मुलतान सुलतानच्या या सामन्याचा हिरो होता रिले रुसो. त्याने ५१ चेंडूत १२ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १२१ धावांची खेळी केली. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने रिले रुसो अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत, इंडियन प्रीमियर लीगच्या अगदी आधी, रुसोच्या बॅटने ही स्फोटक खेळी दिल्ली कॅपिटल्सला खूप आनंद देईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४१ चेंडूत सर्वात जलद शतक, त्याचाच विक्रम मोडला

कर्णधार मोहम्मद रिझवान बाद झाल्यावर हा डावखुरा आफ्रिकेचा फलंदाज दुसऱ्याच षटकात खेळपट्टीवर आला. रुसो येताच रावळपिंडी स्टेडियमवर चौकार आणि षटकारांचा पाऊस सुरू झाला. रुसोने अवघ्या १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे पीएसएलमधील संयुक्त सर्वात वेगवान अर्धशतक होते. जर हे पुरेसे नव्हते, तर रुसोने आपली आक्रमण शैली सुरू ठेवली आणि १६व्या षटकात त्याचे धडाकेबाज शतक पूर्ण केले.

२४३चे लक्ष्य लीलया केले पार

१९व्या षटकात रौसोला बाद करून अजमतुल्ला ओमरझाईने झंझावात रोखली, पण तोपर्यंत त्याने आपले काम केले होते. रुसोने ५१ चेंडूत (१२ चौकार, ८ षटकार) १२१ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुलतानने २४३ धावांचे अशक्य वाटणारे लक्ष्यही गाठले आणि पहिल्या ५ चेंडूत ४ गडी राखून विजय मिळवला. पीएसएलमधील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करण्याचा हा नवा विक्रम ठरला. रौसो व्यतिरिक्त किरन पोलार्ड (५२ धावा, २५ चेंडू) आणि अन्वर अली (नाबाद २४ धावा, ८ चेंडू) यांनीही बरीच खेळी केली.

हेही वाचा: INDvsAUS 4th Test: शुबमन गिलचा नाद करायचा नाय! टेस्टमध्ये झळकावले दुसरे शतक, अहमदाबाद कसोटी झाली रोमांचक

पाकिस्तान सुपर लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हा फलंदाज कमाल करतो आहे. पीएसएलनंतर भारतात आयपीएलमध्ये धमाल करताना दिसणार आहे. आयपीएल २०२३ साठी झालेल्या मिनी लिलावात, दिल्लीने ४.६० कोटी रुपयांची मोठी बोली लावून रूसोचा त्यांच्या संघात समावेश केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psl 2023 before ipl 2023 riley russo created a ruckus in pakistan hit an excellent century by hitting 12 fours and 8 sixes avw