Rohit Sharma poster in PSL: पाकिस्तान सुपर लीग २०२३ मध्ये बुधवारी मुल्तान सुलतान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात मुल्तान स्टेडियमवर सामना खेळला जात होता. यादरम्यान विराट कोहली किंवा बाबर आझम दोघेही नाही तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा पाकिस्तानी चाहता दिसला. त्याचवेळी रोहितचा चाहता स्टेडियममध्ये त्याचे पोस्टर दाखवताना दिसला. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
खरं तर मोहम्मद रिझवानच्या संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीच्या लाहोर कलंदर्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे जगभरात चाहते आहेत. याची झलक पाकिस्तानमधील पीएसएल सामन्यादरम्यानही पाहायला मिळाली. लाईव्ह मॅचदरम्यान एका पाकिस्तानी चाहत्याने रोहित शर्माचे पोस्टर फिरवले. चाहत्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे जगभरात चाहते आहेत. दरम्यान, पाकिस्तानी देशांतर्गत लीगमध्ये हे दिसून आले आहे. वास्तविक, पीएसएलच्या मुलतान सुल्तान्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या एका चाहत्याने त्याचे पोस्टर दाखवले. त्यानंतर तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रोहित शर्माचा पाकिस्तानी फॅन त्याचा फोटो घेऊन उभा आहे. यावरून काही भारतीय चाहत्यांनी टीम इंडिया पाकिस्तानात यावी यासाठी पीसीबी करत तर नसेल ना असे देखील प्रश्न उपस्थित करत आहे.
दुसरीकडे, पीएसएल २०२३ मुलतान सुलतान्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स दरम्यान, इहसानुल्लाहने त्याच्या दुसऱ्या पीएसएल सामन्यातच पाच विकेट घेत वर्चस्व गाजवले. या सामन्यात त्याने चार षटकात केवळ १२ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, सुलतानचे गोलंदाज सुरुवातीपासूनच क्वेटाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसले आणि त्यांना केवळ ११० धावांत गुंडाळले.
या सामन्यात सुलतानला २० षटकात विजयासाठी फक्त १११ धावांची गरज होती. संघाची पहिली विकेट केवळ तीन धावांत गमवावी लागली होती. यानंतर मोहम्मद रिझवान आणि रिले रोसो यांच्यात विजयी भागीदारी झाली. यादरम्यान रिलेने तीन षटकार आणि नऊ चौकारांच्या मदतीने अवघ्या ४२ चेंडूत १८५ धावांची खेळी करत नाबाद ७३ धावांची खेळी केली आणि संघाला नऊ गडी राखून विजय मिळवून दिला.