Pakistan Bomb Blast: पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील पाकिस्तान सुपर लीगचा प्रदर्शनीय सामना क्वेट्टा येथील मुसा चौक येथे स्फोट झाल्याच्या वृत्तानंतर रद्द करावा लागला. बुगाती स्टेडियममध्ये प्रदर्शनीय सामना खेळला जात असलेल्या सामन्यापासून स्फोटाचे ठिकाण केवळ १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या अनेक स्टार खेळाडूंशिवाय माजी क्रिकेटपटूंचाही सहभाग होता.
मात्र, नंतर सामना पुन्हा सुरू झाला. वृत्तांवर विश्वास ठेवला तर तेथील चाहत्यांनी स्टेडियमची तोडफोडही केली. स्टेडियमबाहेरील प्रेक्षकांनी मैदानावर दगडफेक केली. मैदानाच्या आतून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धूरही दिसत आहे, असे म्हटले जात आहे की, स्थळाबाहेरील लोकांनी काहीतरी पेटवले होते, ज्यामुळे आग लागली.
नवाब अकबर बुगाती स्टेडियमपासून काही मैलांवर रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि शाहिद आफ्रिदी यांच्यासह शीर्ष पाकिस्तानी क्रिकेटपटूंना सुरक्षेद्वारे ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले. हे खेळाडू पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) चा एक प्रदर्शनीय सामना खेळत होते, जो स्फोटानंतर काही काळ थांबला होता. पोलिस लाइन्स परिसरात हा स्फोट झाला असून त्यात पाच जण जखमी झाले आहेत.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बचाव कार्य पूर्ण झाले असून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) रविवारी एका निवेदनात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, सुरक्षा अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले होते. स्फोटानंतर स्टेडियमबाहेरील प्रेक्षकांनी मैदानावर दगडफेक सुरू केली. मैदानाच्या आतून शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये धूरही दिसत होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पीएसएल संघ क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झाल्मी यांच्यातील प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन केले होते. स्फोट होताच खबरदारीचा उपाय म्हणून सामना थांबवण्यात आला आणि काही काळ खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. नंतर सामना पूर्ववत झाला. सामन्यासाठी मैदान खचाखच भरले होते.
सामन्यात नेमकं काय झालं होत?
या सामन्यात इफ्तिखार अहमदने ५० चेंडूत नाबाद ९४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर क्वेटा ग्लॅडिएटर्सने बाबर आझमची टीम पेशावर झल्मीला १८५ धावांचे लक्ष्य दिले. इफ्तिखार अहमदने ५० धावा पूर्ण करण्यासाठी ४२ चेंडू खेळले. पण, क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या डावातील शेवटच्या षटकात त्याने षटकारांचा एवढा पाऊस पाडला की संपूर्ण खेळच पालटला. क्वेटा ग्लॅडिएटर्सची धावसंख्या १९ षटकांत ५ गडी गमावून १४८ धावा होती. मात्र शेवटच्या षटकात इफ्तिखारने वहाबविरुद्ध सलग ६ षटकार ठोकले. या ६ षटकारांमुळे क्वेटाची धावसंख्या २० षटकांत १८४ धावांपर्यंत पोहोचली. इफ्तिखारने अखेर ८ चेंडूत ४४ धावा ठोकल्या.