Tycoon Alamgir Khan Tareen Suicide: पाकिस्तान सुपर लीग (PSL) फ्रँचायझी मुल्तान सुलतान्सचे मालक आलमगीर तरीन यांनी लाहोरमधील गुलबर्ग भागातील त्यांच्या घरी आत्महत्या केली. प्रतिष्ठित येल विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आलमगीर यांनी वयाच्या ६३व्या वर्षी आपले जीवन संपवले. त्यांनी दक्षिण पंजाब, पाकिस्तानमध्ये एक अग्रगण्य व्यापारी म्हणून नाव कमावले आणि देशातील सर्वात मोठ्या जलशुद्धीकरण प्रकल्पांपैकी एक चालवला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुल्तान सुल्तान्सचे सीईओ हैदर अझहर यांनी स्वत: आलमगीरच्या मृत्यूची पुष्टी केली आणि त्यांच्या कुटुंबाप्रती तीव्र दु:ख आणि शोक व्यक्त केला.

अझहर म्हणाला, “आलमगीर तरीन हे आमच्या टीमचे एक महत्त्वाचे सदस्य आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आकस्मिक आणि अकाली मृत्यूने आम्हाला खूप दुःख झाले आहे. आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत या आश्चर्यकारक कठीण काळात आहेत.” पीएसएल फ्रँचायझी, लाहोर कलंदर्सनेही या बातमीवर शोक व्यक्त केला आणि सांगितले की, “तरीनच्या निधनाची बातमी ऐकून त्यांना धक्का बसला आहे.” फ्रँचायझीने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आलमगीर तरीनचे कुटुंब आणि मुलतान सुलतान यांच्यासोबत या कठीण काळात एकजुटीने उभे आहोत.”

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Stree 2 Actor Mushtaq Khan Kidnapping
१२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुलतान सुल्तान्सच्या अधिकृत वेबसाइटनुसार, आलमगीर “एक क्रीडाप्रेमी होता ज्याला महत्वाकांक्षी खेळाडू आणि महिलांसाठी एक ठोस व्यासपीठ स्थापित करण्याच्या दिशेने काम करायचे होते आणि त्यांना त्यांचे कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी सर्वोत्तम संभाव्य संसाधने उपलब्ध करून देण्याची इच्छा होती”.

हेही वाचा: Duleep Trophy 2023: विंडीज मालिकेतून वगळताच पुजाराने ठोकले शानदार शतक, सूर्यकुमारनेही दाखवला जलवा

२०२१ मध्ये, मुलतान सुलतानने फायनलमध्ये पेशावर झल्मीला पराभूत करून प्रथमच पीएसएलचे विजेतेपद जिंकले. या संघात मोहम्मद रिझवानसारखे पाकिस्तानचे सर्वोत्तम खेळाडू आहेत. त्याचबरोबर परदेशी खेळाडूंमध्ये डेव्हिड मिलर आणि रिले रुसो ही मोठी नावे आहेत. हा संघ २०१८ मध्ये PSL चा भाग बनला आणि आतापर्यंत सहा हंगामात एकदाच विजेतेपद पटकावण्यात यशस्वी झाला आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांना ते त्यांच्या गुलबर्ग निवासस्थानी एक पिस्तूल आणि सुसाईड नोटसह मृतावस्थेत सापडले. या चिठ्ठीत आलमगीर खान यांनी लिहिले आहे की, “ते अनेक आजारांनी त्रस्त होते. ज्या खोलीतून त्यांनी स्वत:वर गोळी झाडली त्याच खोलीतून पोलिसांनी एक ग्लॉक पिस्तूलही जप्त केले.”

हेही वाचा: IND vs WI: रिंकू सिंगची निवड न करून BCCIने केली मोठी चूक? आकाश चोप्रा म्हणाला, “तिलक वर्माऐवजी लोअर ऑर्डरला…”

डिसेंबरमध्ये लग्न होणार होते

तरीनच्या जवळच्या मित्रांचे म्हणणे आहे की, “आजकाल त्यांचा व्यवसायही चांगला चालत नव्हता, त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता.” आलम या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार होता, असा जवळच्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीत ही घटना धक्कादायक आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, बुधवार, ६ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत आलमगीर आपल्या खोलीतून बाहेर आले नव्हते. त्याच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात ते मृतावस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली.

Story img Loader