Vinesh Phogat on PT Usha: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो महिला कुस्ती स्पर्धेत उत्तम खेळ करत अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम नोंदविला. मात्र अंतिम सामन्याआधी काही ग्रॅमने तिचे वजन अधिक भरल्यामुळे अंतिम सामन्यासाठी तिला अपात्र ठरविण्यात आले. यानंतर विनेश फोगट कोलमडून पडली होती. तिला ऑलिम्पिक व्हिलेजमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, यावेळी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी तिची भेट घेऊन विचारपूस केली होती. या भेटीचा फोटो त्यावेळी समोर आला होता. आता या प्रसंगाबद्दल विनेश फोगटने खळबळजनक दावा केला आहे. पीटी उषा यांनी मला न विचारता, गुपचूप फोटो काढला, असा आरोप विनेश फोगटने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विनेश फोगट हरियाणातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाली की, ऑलिम्पिकमध्ये वजन अधिक भरल्यानंतर जो गोंधळ निर्माण झाला, त्यादरम्यान पीटी उषा यांनी कोणतीही मदत केली नाही. मात्र नंतर त्यांनी सोशल मीडियावर असा भास निर्माण केला की, त्या खेळाडूंच्या पाठिशी आहेत. “मला ऑलिम्पिकमध्ये कोणते सहकार्य मिळाले, हा प्रश्न आता पडला आहे. पीटी उषा मला भेटायला आल्या, त्यांनी एक फोटो घेतला आणि त्यानंतर बंद दाराआड राजकारण शिजले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बरेच राजकारण घडले. त्यामुळेच मला खूप धक्का बसला. अनेक लोक मला म्हणतात की, कुस्ती सोडू नको. पण कोणत्या कारणासाठी मी कुस्ती सुरू ठेवायची? प्रत्येक क्षेत्र आता राजकारणाने व्यापले आहे”, असा आरोप विनेश फोगटने केला.

हे वाचा >> Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

विनेश फोगट पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही रुग्णालयात बेडवर निपचित पडलेले असता, तेव्हा बाहेरच्या जगात काय चालले आहे, याची कल्पना नसते. तेव्हा तुम्ही आयुष्याच्या कठीण काळातून मार्गक्रमण करत असता. अशावेळी तुम्ही फक्त एकदा भेटायला येऊन फोटो काढता आणि सोशल मीडियावर असे भासवता की, तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहात. पाठिंबा दर्शविण्याचा हा कोणता मार्ग आहे? तुम्ही या पेक्षा अधिक करू शकला असता.”