भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालशी मतभेद झाल्याच्या चर्चेबाबत राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी मौन बाळगले आहे. आशियाई स्पर्धा काही दिवसांवर आली असताना मी या प्रकरणी कोणतेही भाष्य करणार नाही, असे गोपीचंद यांनी सांगितले.
फॉर्मसाठी झगडणाऱ्या सायनाने इन्चॉन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी माजी मुख्य प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या स्पर्धेनंतर मी पुन्हा हैदराबादमध्ये परतणार आहे, असे सायनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या प्रकारानंतर गोपीचंद यांनी स्पष्टीकरण देणे मात्र टाळले.
ते म्हणाले, ‘‘गेली दहा वर्षे आम्ही एकत्रित काम करत आहोत. जे काही घडले, त्याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. मी मंगळवारी सकाळी याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रात वाचले. आशियाई स्पर्धा दोन आठवडय़ांवर येऊन ठेपली असताना याबाबत प्रतिक्रिया न देणेच उचित ठरेल. खेळाडूने कुठेही सराव केला तरी त्याने खेळावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे याविषयी नंतरच बोलणे योग्य ठरेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा