भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने RP-SG Indian Sports Honours हा पुरस्कार सोहळा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) पथकावर अतिरेक्यांनी हल्ला केला, ज्यात ४० जवानांना आपले प्राण गमवावे लागले. जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संस्थेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली असताना विराटने हा सोहळा आयोजित करणं योग्य नसल्याचं म्हणत सोहळा लांबणीवर टाकला आहे.

याचसोबत विराट कोहलीने आपल्या ट्विटर हँडलवरुन अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याला सलाम केला असून या कठीण प्रसंगात आपण जवानांसोबत असल्याचंही विराटने सांगितलं आहे. Indian Sports Honours हा विराट कोहली फाऊंडेशन आणि आरपी संजीव गोएंका सुमहाने आयोजित केलेला सोहळा आहे.

२४ फेब्रुवारीपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार असून घरच्या मैदानावर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ टी-२० आणि ५ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Story img Loader